पाच लाखासाठी विवाहितेचा छळ; सहा जणांविरोधात गुन्हा दाखल

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ नोव्हेंबर २०२१ । फैजपूर येथे माहेर असलेल्या एका विवाहितेला पाच लाखासाठी छळ केला जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी विवाहितेच्या फिर्यादीवरून पतीसह सासरकडील सहा जणांविरोधात फैजपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर असे की, सोनल रवी चिमणकर ( वय-२९ ) रा. फैजपूर ता. यावल यांचा विवाह मध्यप्रदेशातील रवि जानकर चिमणकर रा. बाणगंगा, भोपाल मध्यप्रदेश यांच्याशी रितीरिवाजानुसार झाला. २४ एप्रिल २०१८ ते आजपर्यंत पती रवी चिमणकर यांने विवाहितेला लहान गोष्टींवरून शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. त्यानंतर घर बांधण्यासाठी माहेरहून ५ लाख रूपये आणावे, यासाठी मारहाण केली. तर सासून, सासरे, तीन नंदा यांनी चापटा बुक्क्यांनी मारहाण केली. त्यात तू जर पैसे आणले नाही तर तुला नांदविणार नाही. अशी धमकी दिली. हा त्रास सहन न झाल्याने विवाहिता फैजपूर येथील माहेरी निघून आल्या.

याप्रकरणी मंगळवारी १६ नोव्हेंबर रोजी फैजपूर पोलीसात पती रवि चिमणकर, सासून इंदूबाई जानकर चिमणकर, सासरे जानकर किसन चिमणकर सर्व रा. भोपाल, नणंद राखी मनोहर खिरोडकर रा. रायपूर छत्तीसगड, लता विजय वानखडे रा. जळगाव, माया संदीप साखरे रा. शेंदुणी जामनेर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ अनिल पाटील करीत आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज