पारोळा येथे विवाहितेचा विनयभंग; गुन्हा दाखल

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ नोव्हेंबर २०२१ । पारोळा येथील शिंदे गल्लीत एका संशयिताने माझ्याशी लग्न कर अन्यथा तुला मुलाबांळांसह ठार करेल, अशी धमकी देत विवाहितेचा विनयभंग केल्याची घटना रविवारी पहाटे घडली. हितेंद्र रामकृष्ण शिंदे ( वय माहित नाही ) असे संशियिताचे नाव आहे. या प्रकरणी विवाहितेच्या फिर्यादीवरून संशयित शिंदेविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

अशी दिली धमकी 

संशयिताने विवाहितेला लग्न न केल्यास तुला व मुलांना जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी दिली. तसेच ब्लेडने विवाहितेच्या हातावर, मानेवर, चेहऱ्यावर आणि दंडावर वार करून जखमी केले. याप्रकरणी संशयित शिंदेविरुद्ध पारोळा पोलिसांत गुन्हा दाखल झाला.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज