दिवाळी स्पेशल रेसीपी : कडबोळी

जळगाव लाईव्ह न्यूज । ०१ नोव्हेंबर २०२१ । दिवाळी म्हटलं की चकली आलीच. दरवर्षी दिवाळीला आपण चकली खातोच. मात्र तुम्ही कधी कडबोळीची चव चाखून किंवा बनवून खाल्ली आहे का? चला तर मग जाणून घेऊ या कडबोळी कशी बनवतात…

साहित्य – तांदूळ पिठी – दोन वाट्या, मैदा – एक वाटी, जिरे पावडर पाव-चमचा, हिंग – दोन चिमटी, तिखट मीठ चवी नुसार, हळद -पाव चमचा, तूप – दोन चमचे, मोहनसाठी तेल, तळणासाठी पाणी , आवश्यकते नुसार.

kadboli recipe in marathi रसप च मखय फट

कृती – परातील तांदुळाची पिठी, मैदा, तिखट, मीठ, हिंग, जिरे पावडर, हळद सर्व नीट एकत्रित करावे. तुपाचे मोहन सर्व पिठाला चोळून द्यावे, पाणी टाकून पीठ घट्ट भिजवून द्यावे. १५ मिनिट झाकून ठेवावे नंतर पीठ मळून घेऊन पोळपाटावर लहान – लहान कडबोळी तयार करून घ्यावी फार जाडसर नसावीत. कडईत तेल गरम करून मध्यम आचेवर सोनेरी रंगात खरपूस टाळून द्यावी.

सौ. मिनाक्षी प्रकाश वाणी – जळगाव

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज