fbpx

आजचे राशिभविष्य : २८ मे २०२१

mi-advt

मेष

आजचा आपला दिवस मनस्तापदर्शक, काहीसा अडीअडचणींनी युक्त असा जाऊ शकतो. काही आर्थिक नुकसान देखील संभवते. त्यामुळे संयम ठेवणे आवश्यक राहीलं. मनाचा तोल ढळणार नाही याची काळजी घ्या.

वृषभ

आज जोडीदाराशी मतभिन्नता, वादविवादासारखे प्रसंग टाळण्याचा प्रयत्न करा. आपल्या रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक राहील. व्यवसायातील भागीदार, सहकारी यांच्याही मतांचा आदर करा.

मिथुन

आजच्या दिवशी मानसिक व प्रकृती अस्वास्थ्य जाणवेल. आरोग्याच्या काही समस्या जाणवतील. त्यावर योग्य वेळी उपचार करून घेणे फायद्याचे राहील. विरोधक, हितशत्रूंच्या कारवायांना चोख उत्तर द्याल.

कर्क

आजच्या दिवशी काहीशी नकारात्मकता आपल्याला जाणवेल. मात्र सकारात्मक विचारांनी आपल्या पुढील कार्य पूर्ण करा. मनावरील मळभ झटकून नव्या उत्साहाने, उमेदीने आजचा दिवस व्यतीत करणे फायद्याचे राहील.

सिंह

आजच्या दिवशी गृहसौख्यात काहीशी उणीव भासेल. काही मनाविरुद्ध, अप्रिय घटना घडण्याची देखील शक्यता आहे. मात्र आपण निराश न होता शांततेने, प्रेमाने व धीराने काही प्रसंग हाताळण्याची आवश्यकता राहील.

कन्या

आज आपली मानसिकता काहीशी अशांत व असमाधानी राहील. कुठेही स्वतःचे विचार व्यक्त करताना आपल्या वाणीवर व क्रोधावर नियंत्रण आवश्यक राहील. भावंडांशी मतभेद होणार नाहीत याची काळजी घ्या.

तुळ

आज कुटुंबीयांसमवेत रममाण होण्याचा दिवस आहे. मात्र आपल्या बोलण्याने परिवारातील सदस्यांची मने दुखावली जाणार नाहीत, याची काळजी घ्यावी. आज आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींवर देखील नियंत्रण ठेवावे.

वृश्चिक

बऱ्याच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आजचा उत्साह पूर्ण दिवस आलेला आहे. त्याचा योग्य विनियोग करा. विनाकारण चिडचिड, मनस्ताप टाळा. मन व चित्त शांत ठेवण्याचा प्रयत्न करा.

धनु

आजच्या दिवशी काही मनाविरुद्ध घटना घडण्याची शक्यता राहील. त्यामुळे मनस्ताप होऊ शकतो. दैनंदिन खर्चा व्यतिरिक्त काही अन्य खर्च उद्भवू शकतात. खर्चाचा योग्य ताळमेळ साधणे कठीण होईल.

मकर

आजच्या दिवशी खोटी स्तुती वा प्रशंसा यांना बळी पडू नका. मित्र मंडळींवर अति विश्वास ठेवू नये. फसवणूक होण्याची शक्यता संभवते. कोणत्याही आमिषांना, प्रलोभनांना भुलून जाऊ नका.

कुंभ

आज कामाच्या ठिकाणी अनेक जबाबदाऱ्या आपल्यावर येतील. त्यामुळे कामाचा अतिरिक्त तणाव जाणवेल. शांतचित्ताने आपल्या नित्य कर्मावर लक्ष ठेवणे फायद्याचे राहील. विनाकारण विचलित होऊ नका.

मीन

आज भाग्याची व नशिबाची साथ लाभेल. काही शैक्षणिक व अध्यात्मिक कार्यात दानधर्म कराल. त्यामुळे आपला आनंद द्विगुणित होईल. आज काही अनोळखी व्यक्तींच्या गाठीभेटी देखील संभवतात.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज