जळगाव लाईव्ह न्यूज । ५ ऑगस्ट २०२४ । पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत धरणगाव तालुक्यातील गंगापुरी, पष्टाने, अंजनविहिरे येथील शेकडो तरुणांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला यावेळी गुलाबराव पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर तसेच जळगाव ग्रामीण मतदार संघाच्या विकास कामांवर विश्वास ठेवून आज या ठिकाणी अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला असल्याचे प्रतिपादन गुलाबराव पाटील यांनी केले. प्रमुख कार्यकर्त्यांनी या कार्यकर्त्यांना पक्षात आणण्याचा प्रयत्न केला सगळ्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला असून याला तळा जाणार नाही. यातील बरेचसे कार्यकर्ते हे भिल्ल समाजाचे असून ज्या गावात भिल्ल समाज आहे तेथे एकलव्य यांची मूर्तीची स्थापना करण्याचा संकल्प केला आहे, असे गुलाबराव पाटील म्हणाले. तसेच पुढच्या काळात त्यांच्या वस्तीचा विकास करणे, लाडकी बहीण योजना त्यांच्या घरापर्यंत पोहोचविणे, संजय गांधी निराधार योजना अशा सर्व गोष्टींचा लाभ देण्याकरिता आमचे कार्यकर्ते कटिबद्ध असल्याचे देखील गुलाबराव पाटील म्हणाले.
माझ्यावर किती टीका होत आहे यावर मी लक्ष देत नाही. आपण आपले काम करत राहायचे. आता निवडणुका जवळ येतील तेव्हा यापेक्षा जास्त टीका माझ्यावर होईल त्यामुळे टीकेला उत्तर देण्यापेक्षा कामाने उत्तर देऊ हे मी या ठिकाणी ठरवलेले असल्याचे गुलाबराव पाटील म्हणाले . पष्टाणे गावातील भादेश पाटील, अक्षय पाटील, कुंदन पाटील, योगेश पाटील, ज्ञानेश पाटील, एकनाथ पाटील, सागर गायकवाड, धनराज मोरे, भूषण पाटील, निवृत्ती पाटील, हेमंत पाटील, कैलास पाटील, उज्वल देवरे, पियुष पाटील, हितेश पाटील तर अंजनविहिरे गावातील रामदास सोनवणे, सुरेश भिल, अजय भिल, विजय भिल, राजेंद्र कालू भिल, युवराज भिल, सुरसिंग भिल, बंसीलाल बिल, ज्ञानेश्वर भिल, पिंटू भिल, साहेबराव भिल, कालू भिल, जयवंत भिल तसेच गंगापुरी गावातील राहुल भिल, सतीश सोनवणे, ज्ञानेश्वर वाघ, आकाश वाघ, अनिल वाघ, साईनाथ मोरे, नंदलाल सोनवणे, रवींद्र गायकवाड, ज्ञानेश्वर वाघ, महेंद्र सोनवणे, अजय सोनवणे, वीरेंद्र सोनवणे, धनंजय सोनवणे, प्रवीण वाघ, बहिरव वाघ, अरुण मोरे, किरण गायकवाड यांनी प्रवेश केला.
यावेळी धरणगाव तालुक्याचे तालुकाप्रमुख व्ही. ए. पाटील, जळगाव तालुकाप्रमुख शिवराज पाटील, दूध फेडरेशनचे संचालक रमेश पाटील, धरणगाव तालुका शिवसेनेचे तालुका संघटक रवी चव्हाण, शेतकी संघाचे जळगाव संचालक दिपू दादा यांच्यासह अनेक कार्यकर्ते, सरपंच, विभाग प्रमुख, शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.