मंत्रालयात दारूच्या बाटल्या ..म्हणून गुलाबराव येड्यासारखी बडबड करतात

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ ऑगस्ट २०२१ । राज्याचे मुख्य स्थान असलेल्या मंत्रालयात दारूच्या बाटल्या आढळून आल्याचे वृत्त माध्यमातून प्रसिद्ध झाले आहे. यानंतर माजी खासदार निलेश राणे यांनी ठाकरे सरकारचा खरपूस समाचार घेतला असून जळगावचे पालकमंत्री आ.गुलाबराव पाटील व नवाब मलिक यांनाही ट्वीट करीत टोमणा लगावला आहे.

मंत्रालयात दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा खरंच सापडल्याचे वृत्त माध्यमातून समोर आले होते मंत्रालयाची सुरक्षा व्यवस्था भेदून दारूच्या बाटल्या आत गेल्यास कशाला असा प्रश्न उपस्थित होत होता दारूच्या बाटल्या प्रकरणावरून विरोधकांनी महा गाडी सरकारवर चांगलेच ताशेरे पडले आहेत माजी खासदार निलेश राणे यांनी भरमसाठ करून ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे.

मुंबई नाईटलाइफची स्वप्ने पाहणारे असे म्हणत त्यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना टोमणा लगावला आहे. तसेच आता कळाले… ठाकरे सरकारमधील काही मंत्री गुलाबराव आणि नवाब भाई सारखे येड्या सारखं का बडबड करत असतात.. झिंग, झिंग, झिंगाट.. मंत्रालयातच चालू असेल तर मग हे शुद्धीत कसे असणार? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.


राणे कुटुंबीय आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यातील वाद सर्वांनाच माहिती आहे. आजवर दोघांनी एकमेकांवर अनेकवेळा टीका केली आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -