fbpx

मनियार बिरादरी डेडिकेट कोव्हिड सेंटर रूग्णांसाठी जीवदानी

जळगाव : जळगाव जिल्ह्यात सेवाभावी संस्थांचे कोव्हिड महामारीमध्ये सुरू असलेले कार्य कौतूकास्पद आहे. यामध्ये विशेष बाब म्हणजे जळगाव जिल्हा मनियार बिरादरीने शासकीय औद्योगिक संस्थेमध्ये सुरू केलेले प्रायव्हेड डेडिकेट कोव्हिड सेंटर हे रूग्णांसाठी जीवदानी ठरत आहे.

ना नफा ना तोटा तत्त्वावर सुरू असलेल्या मनियार बिरादरी कोव्हिड सेंटर मुळे अनेकांना आर्थिक-मानसिक दिलासाही मिळाला आहे.

mi advt

९ एप्रिल ला सुरू झालेले कोव्हिड सेंटरमध्ये दि. ८ मे  च्या संध्याकाळ पर्यंत एकूण ५० रूग्णांना सेवा दिली. यापैकी तब्बल ३९ रूग्णांनी कोरोनावर मात केली असून यामध्ये २७ पुरूष तर १२ महिलांचा समावेश होता. दरम्यान आतापर्यंत ७ जणांची प्रकृती खालाविल्याने त्यांना इतरत्र हलविण्यात आले तर ४ रूग्णांचा उपचारदरम्यान मृत्यू झाला आहे.

२५ खाटांचे असलेले मनियार बिरादरी रूग्णालयामध्ये १० आयसीयु, 3 बायपॅक व १२ नॉन ओटु बेड अशी यंत्रणा उभारण्यात आली आहे. वैद्यकिय क्षेत्राचा कोणताही अनुभव नसताना क्रीडा क्षेत्रातील खेळाडू, प्रशिक्षक व संघटक च्या अनुभवा वरून  फारूक शेख अब्दुला यांनी हे रूग्णालय सामाजिक संघटनेच्या माध्यमातून समर्पित भावनेतून सुरू केले असून अल्पावधित त्यांच्या रूग्णसेवेमुळे जळगावकरांना दिलासा मिळाला आहे.

यासाठी त्यांनी वैद्यकिय क्षेत्रातील तज्ज्ञ  मंडळीची टिम तयार केली. टिमवर्क करून कोव्हीड रूग्णांची सेवा केली  आहे. मनियार बिरादरी कोव्हिड सेंटरमध्ये डॉ. सुयोग चौधरी, डॉ. मंदार पंडित यांच्या नेतृत्त्वाखाली डॉ. रियाज बागवान, डॉ. मोहसिन शेख, डॉ फैसल शेख यांच्यासह नर्सिंग स्टाफमध्ये रेखा गायकवाड, वृषाली महाजन, रजनी बाविस्कर, निकिता साळुंखे, मेघा तडवी, नितीन जाधव, रईस शेख यांना सोबत घेऊन रूग्णांचे प्राण वाचवित आहेत. नर्सिंग स्टाफसह दानिश शेख, अर्षद शेख, वकार शेख, सारंग सपकाळे,मुजाहिद खान, अबुजर शेख यांचेही सहकार्य मिळत असते.

शासनाने ठरवून दिलेल्या दरांपेक्षाही कमी दरात सूरू असलेले मनियार बिरादरी रूग्णालयामध्ये नॉन ओटु बेडला दोन हजार रूपये, आयसीयू ला सहा हजार रूपये, बायपॅकला सात हजार पाचशे रूपये आकारले जातात.

 जिल्हाबाहेरील रूग्णांचीही सेवा

मनियार बिरादरी कोव्हिड डेडिकेट रूग्णालयामध्ये जळगाव शहरासह जिल्हातील नशिराबाद, फैजपूर, पाचोरा, एरंडोल, रावेर येथील रूग्णांची सेवा केली जात असतानाच मुंबई, सुरत, अमरावती, धुळे, तोंडापूर, फत्तेपूर, सिल्लोड, पनवेल येथील रूग्णांनीसुद्धा येथे येऊन उपचार घेतले.

कोविड रक्त तपासणी व सी. टी. ची सुद्धा सोय

मार्च महिन्या पासून बिरादरी तर्फे एच आर सी टी फक्त १८०० रु तर संपूर्ण कोविड रक्त तपासणी फक्त १३०० रु मध्ये तज्ञा कडून करून देत आहे.

शासकिय नियमांचे तंतोतंत पालन

कोव्हिड डेडिकेट सेंटर साठी लागणारी शासकिय नियमांचे मनियार बिरादरी कोव्हिड डेडिकेट सेंटरमध्ये तंतोतंत पालन केले जात आहे.  बायोमेट्रिक वेस्ट असो की फायर, इलेक्ट्रिक ऑडिट असो सर्वांचे पालन केले जात आहे. तसेच शासनाने घालून दिलेल्या कोरोना संबंधित नियमांचेही येथे पालन केले जात आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज