माहेश्वरी विवाह सहयोग समिती अध्यक्षपदी मनीष झंवर

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २ जानेवारी २०२२ । माहेश्वरी विवाह सहयोग समितीची नवीन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली असून, समितीच्या अध्यक्षपदी मनीष झंवर यांची निवड करण्यात आली आहे.

जळगाव माहेश्वरी विवाह सहयोग समितीच्या कार्यकारिणीची बैठक शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता प्रभुदेसाई कॉलनीतील समितीच्या कार्यालयात पार पडली. बैठकीत सर्व कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.

यावेळी समितीचे सचिव सूरजमल सोमाणी यांनी मागील बैठकीचा इतिवृत्तांत सभेत दिला. त्यानंतर श्यामसुंदर झंवर यांनी मनोगत व्यक्त केले. समितीच्या वतीने ऑनलाइन परिचय संमेलन घेण्यात आले होते. त्यावर चर्चा करण्यात आली. सहकोषाध्यक्ष वेकानंद सोनी यांनी खर्चाचा हिशोब बैठकीत मांडला.

दरम्यान, बैठकीत श्यामसुंदर झंवर यांनी समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर सर्वानुमते मनीष झंवर यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तर सचिव डॉ. जगदीश लड्ढा, कोषाध्यक्ष विवेकानंद सोनी, सहकोषाध्यक्ष वासुदेव बेहेडे, उपाध्यक्ष प्रमोद झंवर, कैलास लाठी, सहसचिव तेजस देपुरा, सल्लागार श्यामसुंदर झंवर, सूरजमल सोमाणी, सुभाष जाखेटे यांची एकमताने निवड करण्यात आली. यावेळी बैठकीत नारायण सोमाणी, दीपक लड्ढा, जगदीश जाखेटे, राहुल झंवर, गिरीश झंवर व इतर सदस्य उपस्थित होते.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -