fbpx

मनीष जैन समर्थकांचा ग्रुप निष्कासित

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २० जून २०२१ । जळगाव शहर विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार मनीष जैन हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा सुरू होती. मनीष जैन यांच्या समर्थकांनी व्हाट्सअप ग्रुप तयार करून मोर्चेबांधणी देखील सुरू केली होती. जळगाव लाईव्ह न्युजने याबाबत वृत्त प्रकाशित करताच संपूर्ण ग्रुपच निष्कासित करण्यात आला आहे.

विधानसभा निवडणुकीला अद्याप बराच अवधी शिल्लक असला तरी अनेकांनी तयारीला सुरुवात केली आहे. जळगाव शहर विधानसभा मतदार संघातून माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या कन्या, जिल्हा बँकेच्या अध्यक्ष रोहिणी खडसे या निवडणूक लढविणार असल्याचे चर्चा होती. जळगाव शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी साहिल पटेल यांनी व्हाट्सअपला एक ग्रुप तयार केला होता त्या ग्रुपमध्ये शहरातील अनेक मान्यवरांचा समावेश होता मध्यंतरी ग्रुपचे नाव ‘रोहिणीताई खडसे भावी आमदार’ असे करण्यात आले होते. परंतु दोन दिवसापूर्वी एका ॲडमिनने ग्रुपचे नाव बदल करीत ‘मनीषदादा जैन भावी आमदार’ असे केले. जळगाव शहरातून मनीष जैन हे निवडणूक लावणार का असा प्रश्न त्यामुळे उपस्थित होता.

ग्रुपचे अँडमीन अशोक लाडवंजारी व काही मान्यवर देखील होते. ग्रुपमध्ये झालेल्या बदलाबाबत लक्षात येताच आणि जळगाव लाईव्हच्या वृत्तानंतर मुख्य ॲडमिन साहिल पटेल त्यांनी संपूर्ण ग्रुपच निष्कासित केला तर काहींनी ग्रुप स्वता होऊनच ग्रुप सोडला. काही वेळाने साहिल पटेल यांनी मित्र परिवाराचा स्वतंत्र ग्रुप तयार केला आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज