fbpx

खडसेंना दिलासा, मंदाताई खडसेंचा अटकपूर्व जामीन मंजूर

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ ऑक्टोबर २०२१ । भोसरी येथील भूखंड खरेदीप्रकरणी ईडीच्या पथकाकडून खडसे कुटुंबाची चौकशी सुरु आहे. दोन दिवसांपूर्वी पुणे पीएमएल न्यायालयाने मंदाताई खडसे यांचा अटकपूर्व जामीन नामंजूर केला होता. मंदाताई खडसेंवर अटकेची टांगती तलवार लटकत असताना त्यांना खंडपीठाने अटकपूर्व जामीन मंजूर केला असल्याचे समजते. खडसेंच्या जवळील व्यक्तींनी त्यास दुजोरा दिला आहे.

भोसरी येथील भूखंड प्रकरणी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचे जावई गिरीश चौधरी गेल्या महिन्यापासून ईडीच्या ताब्यात आहेत. त्याच प्रकरणात ईडीने खडसेंच्या पत्नी मंदाताई खडसे यांना चौकशीकामी बोलाविले होते परंतु त्या हजर न झाल्याने न्यायालयाने त्यांच्या अटकेचे समन्स काढले होते. दरम्यान, खंडपीठाने मंदाताई खडसे यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

mi advt

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज