fbpx

पॉलीशच्या बहाण्याने दागिने लांबविण्याचा प्रयत्नात असलेल्या एकास अटक

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ ऑक्टोबर २०२१ । दागिने पॉलीश करून देण्याच्या बहाण्याने दागिने लांबविण्याच्या प्रयत्नात असलेल्या एकास नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भटू राठोड (रा. धानवड) हे नेहमीप्रमाणे कामावर गेले असतांना त्यांच्या घरी आलेल्या एका अनोळखी इसमाने त्यांच्या पत्नी वैशाली राठोड यांना हातातील पाटल्या पॉलिश करून देतो असे सांगितले. मात्र पाटल्या काढून त्याच्याकडे देताना वैशाली राठोड त्यांना शंका आल्याने त्यांनी आरडाओरड केली. दरम्यान, तो अल्पवयीन चोरटा पळून जाण्याच्या प्रयत्नात असतांना गावातील हेमंत पाटील, चंद्रकांत आवारे, गजानन चव्हाण आदींनी त्याला पकडून एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी भटू राठोड यांच्या फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

mi advt

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज