गावठी कट्टा, चॉपरने दहशत माजविणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ ऑक्टोबर २०२१ । भुसावळ शहरात बेकायदेशीर हत्यार व गावठी बनावटीचे पिस्तूल घेऊन फिरत असलेल्या संशयित आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. प्रशांत उर्फ गोलू युवराज ठाकुर (रा. हनुमान नगर) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव असून त्याच्याविरुद्ध भुसावळ पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत असे की, भुसावळात संशयित आरोपी प्रशांत उर्फ गोलू ठाकुर हा बेकायदेशीर हत्यार व गावठी बनावटीचे पिस्तूल घेऊन फिरत असल्याची गोपिनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिलाळी. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या पथकाने त्याला अटक केली. त्याच्या ताब्यातील गावठी बनावटीची पिस्तूल व हत्यारे जप्त केली आहे. पुढील कारवाईसाठी भुसावळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

यांनी केली कारवाई
सहाय्यक फोजदार अशोक महाजन, पोहोका लक्ष्मण पाटील, पो. ना. श्रीकृष्ण देशमुख,पो.ना. रणजित जाधव, पो. ना. किशोर राठोड, विनोद पाटील, ईश्वर पाटील यांनी ही कारवाई केली.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज