fbpx

ढालगांव येथे हिवताप प्रतिरोध दिन साजरा

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । ०६ जून २०२१ । संपूर्ण जगात करोना ने थैमान मागील दीड वर्ष पासून घातले आहे,त्याच्याशी सामना करीत असताना आरोग्य विभागाची भरपूर प्रमाणात दमछाक होत असताना दिसत आहे. परंतु करोना सोबत इतर ही आजाराचे नियंत्रण ठेवण्यासाठी आरोग्य विभाग हे जागृत आहे. याचाच एक भाग म्हणजे जून महिना म्हणजे  हिवताप प्रतिरोध महिना राबविण्यात येत असतो.

जामनेर तालुक्यातील ढालगांव येथे तालुका आरोग्य अधिकारी डॉ राजेश दादा सोनवणे व तालुका हिवताप पर्वेक्षक व्ही एच माळी यांच्या मार्गदर्शनाखाली हिवताप प्रतिरोध दिन राबविण्यात आला , डेंगू,मलेरिया, जलद ताप येणे या सारखे साथीचे आजार बद्दल गावात जनजागृती करण्यात आली.

तसेच ताप सर्व्हेक्षण व कंटेनर सर्व्हेक्षण ही करण्यात आले काही कंटेनर मध्ये सुष्म जीव जंत दिसून आलेले कंटेनर लागलीच आरोग्य विभागाच्या वतीने खाली करण्यात आले व त्या बद्दल तेथील नागरिकांना विश्वासात घेऊन डेंगू मलेरिया सारख्या आजार विषयी माहिती देण्यात आली. या वेळी तालुका हिवताप पर्वेक्षक व्ही एच माळी,ढालगांव उपकेंद्र येथील डॉ विवेक जाधव, आरोग्य सेवक मनोज परदेशी, संजीव सूर्यवंशी, रवी सुर्यवंशी आशा सेविका व लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज