fbpx

तुमच्या सुप्त गुणांना जास्तीत जास्त वाव द्या : प्रा. शिल्पा बेंडाळे

जळगाव लाईव्ह न्यूज । १ ऑक्टोबर २०२१ । तुमच्या व्यक्तिगत विकासासाठी रोटरॅक्ट सारखा सोर्स फार महत्त्वाचा असतो. गेल्या अनेक वर्षांपासून मी ते अनुभव घेते आहे. आणि आता पॅन्डॅमिक काळातून बाहेर पडण्यासाठी या सोर्सचा जरुर उपयोग करून घ्या. तुमच्या सुप्त गुणांना जास्तीत जास्त वाव द्या. तुमच्या इच्छाशक्तीच्या बळावर तुम्ही कुठे पोहोचायचे हे तुम्हाला ठरवायचे आहे, असा सल्ला प्रा.डॉ. शिल्पा बेंडाळे यांनी दिला.

केसीईज् आय.एम.आर. रोटरॅक्ट क्लबचा इन्टाॅलेशन सोहळा नुकताच संपन्न झाला. सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी प्रा.डॉ. शिल्पा बेंडाळे ह्या होत्या. याप्रसंगी त्या बोलत होत्या. आय.एम.आर. रोटरॅक्टचे प्रेसिडेंट प्रणिलसिंग चौधरी, सेक्रेटरी स्वप्निल खडसे यांनी आपला पदभार नवीन प्रेसिडेंट अक्षत आणि सेक्रेटरी संजना नाईक यांना सोपविला. याप्रसंगी रोटरी प्रेसिडेंट संदिप शर्मा, सेक्रेटरी मनोज जोशी, आर.आर.सी. प्रा.शुभदा कुलकर्णी आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

याप्रसंगी बोलतांना प्रणिलसिंग चौधरी यांनी गेल्या दोन वर्षांत केलेल्या कामाचा आढावा घेतला. त्यांनी पॅन्डॅमिकमध्यें फार कमी इव्हेंट घेता आले याची खंत व्यक्त करतांना, पॅन्डॅमिक काळात आरोग्य सेवेला हातभार लावता आला, वेळप्रसंगी मदतीला धावून जाता आले, हे प्रचंड समाधान मिळाल्याचे सांगितले. त्यानंतर प्रणिलसिंग चौधरी यांनी चार्टर्ड अक्षत बेंद्रे यांना सुपूर्द केला. तसेच नवीन बोर्ड ऑफ डायरेक्टर्समध्ये समाविष्ट रो. सयाजी जाधव,रो. वेदांत दुसाने, रो. वैष्णवी भंडारकर यांचा सत्कार केला.

कार्यक्रमात आय एम आर मध्ये १५ आगस्टनिमीत्ताने घेण्यात आलेल्या देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ देखिल प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते संपन्न झाला. स्पर्धेतील विजेते प्रथम पारितोषिक आकाश सोनवणे, द्वितीय पारितोषिक संजना इंगळे, तॄतीय पारितोषिक वंशीता भाटिया यांना बक्षीस वितरण करण्यात आले. त्यांनंतर गणपती पेंटिंग स्पर्धेचा निकाल जाहिर करण्यात आला. त्यात विजय चौधरी प्रथम, आकांक्षा पाटील द्वितीय, नेहा योगेश चौधरी तॄतिय क्रमांकाने विजयी ठरलेत. तर गणपती डेकोरेशन स्पर्धेत उत्कर्षा सुर्यवंशी प्रथम,अनुषा मिश्रा द्वितीय, एकता पाटील तृतीय क्रमांकाने विजीय ठरले. या स्पर्धांचे बक्षीस वितरण देखिल याप्रसंगी पार पडले.

त्यानंतर बोलतांना रोटरी प्रेसिडेंट संदिप शर्मा यांनी नवीन रोटरॅक्टर्सला मार्गदर्शन केले. रोटरॅक्ट क्लबच्या कामाविषयी माहिती दिली. रोटरॅक्टर्सला संबोधित करतांना रो.डॉ. शमा सुबोध यांनी, यापुढे न्यू नाॅर्मल मध्ये प्रवेश करतांना वेगवेगळ्या प्रोजेक्टसाठी विचार करा.असे सांगून सर्व रोटरॅक्टर्सला शुभेच्छा दिल्यात. रो.प्रा शुभदा कुलकर्णी यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमाला रो. अशोक जोशी, रो. स्वाती ढाके, रो. पंकज व्यवहारे आणि अनेक रोटरॅक्टर्स आणि रोटेरिअन उपस्थित होते. रोटरॅक्टर् शिवानी चौधरी हिने सुत्रसंचलन केले

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज