⁠ 
रविवार, नोव्हेंबर 24, 2024
Home | राष्ट्रीय | रेल्वे अपघाताने देश हादरला ; एक्सप्रेस रुळावरून घसरल्यानंतर मालगाडीला धडकली, अनेकांचा मृत्यू

रेल्वे अपघाताने देश हादरला ; एक्सप्रेस रुळावरून घसरल्यानंतर मालगाडीला धडकली, अनेकांचा मृत्यू

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २ जून २०२३ । ओडिशामध्ये रेल्वेच एक मोठा अपघात झाला असून यामुळे मोठा हाहाकार उडाला आहे. ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यात आज शुक्रवारी संध्याकाळी कोरोमंडल एक्स्प्रेसचे चार डबे रुळावरून घसरले, त्यानंतर ती दुसऱ्या मार्गावर विरुद्ध बाजूने येणाऱ्या मालगाडीला धडकली. या अपघातात 40 हुन अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला असल्याचं सांगितलं जात असून 350 हून अधिक जखमी झाले आहेत.

जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरू आहे. एनडीआरएफचे पथकही घटनास्थळी पोहोचले आहे. कोरोमंडल एक्स्प्रेस कोलकाताजवळील शालीमार स्थानकावरून चेन्नई सेंट्रलकडे जात असताना बहंगा बाजार स्थानकावर सायंकाळी 7.20 च्या सुमारास हा अपघात झाला.

या घटनेबाबत रेल्वेचे प्रवक्ते अमिताभ शर्मा म्हणाले, शालिमार-चेन्नई कोरोमंडल एक्स्प्रेस बालासोरजवळ सायंकाळी ७ वाजता रुळावरून घसरली. रेल्वेचे डबे समांतर रुळावर घसरले. काही वेळाने यशवंतपूरहून हावडाकडे जाणारी दुसरी ट्रेन त्या डब्यांना धडकली, त्यामुळे तिचे 3-4 डबे रुळावरून घसरले. या अपघातानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेल्वेमंत्र्यांशी चर्चा केली आहे. त्याचवेळी मुख्यमंत्री नवीन पटनायक हेही नियंत्रण कक्षात पोहोचले आहेत.

शोध आणि बचाव कार्यासाठी पथके घटनास्थळी रवाना झाली आहेत, असे विशेष मदत आयुक्त कार्यालयाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.बालासोरच्या जिल्हाधिकार्‍यांनाही सर्व आवश्यक व्यवस्था करण्यासाठी घटनास्थळी पोहोचण्यास आणि राज्य स्तरावरून कोणतीही अतिरिक्त मदत घेण्यास सांगितले आहे. आवश्यकता भासल्यास एसआरसीला कळवण्याचे निर्देश दिले आहेत. ट्रेन प्रवाशांनी खचाखच भरली होती. रेल्वे अपघाताबाबत रेल्वेने आपत्कालीन क्रमांकही जारी केला आहे, जो-6782262286 आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.