मोठी कारवाई : भुसावळ पोलिसांनी पकडला ३३ किलो गांजा

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ डिसेंबर २०२१ । जिल्ह्यात गेल्या काही महिन्यात अंमली पदार्थांच्या तस्करीचे प्रकरण मोठ्याप्रमाणात समोर येत आहेत. गुरुवारी पहाटेच्या सुमारास वाहनातून होणारी गांजा तस्करी भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी गस्तीदरम्यान रोखत 33 किलो गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी धुळ्यातील दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

गुरुवारी मध्यरात्री बाजारपेठ पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक मंगेश गोंटला, हवालदार लतीफ शेख, कॉन्स्टेबल प्रणय पवार हे रेल्वे स्टेशन परीसरात नाकाबंदी करीत असताना मध्यरात्री 2.25 वाजेच्या सुमारास मारोती स्वीप्ट क्रमांक एम.एच.01 बी.टी.6682 हिची तपासणी केली असता वाहनातील दोघांची हालचाली संशयास्पद वाटू लागल्याने वाहनाची डिक्की उघडली असता त्यात प्लॅस्टीक बॅग उघडल्यानंतर त्यात गांजा आढळल्याने वाहनासह दोघांना ताब्यात घेवून पोलिस ठाण्यात आणण्यात आले. या प्रकरणी विजय वसंत धीवरे (45) व नंदकिशोर हिरामण गवळी (28) यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. गांजाची मोजणी केल्यानंतर तो 33 किलो आढळून आला. त्याचे बाजारमूल्य एक लाख 65 हजार असून पाच लाखांचे वाहन जप्त करण्यात आले.

विशेष म्हणजे आरोपींनी रेल्वेतून हा गांजा आणला असून तो वाहनाद्वारे ते धुळे येथे नेत असल्याची माहिती आहे. आरोपींनी हा गांजा कुणाकडून खरेदी केला? खरेदीदार व पुरवठादार कोण? आदी बाबी तपासात निष्पन्न होणार आहेत. स्वीप्ट चालक विजय वसंत धीवरे (45, रा.धुळे) व नंदकिशोर हिरामण गवळी (28, रा.धुळे) अशी अटकेतील आरोपींची नावे आहे. गेल्या दोन महिन्यात गांजा तस्करीची अनेक प्रकरणे समोर आली असून हिरोईन तस्करीमुळे जिल्हा चर्चेत आला होता.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -