fbpx

..तर जिल्हा बँक निवडणुकीत माविआ स्वतंत्र लढणार

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ ऑक्टोबर २०२१ । जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यासाठी दि. २१ नोव्हेंबर रोजी प्रत्यक्ष मतदान होणार आहे. तर दि. २२ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार असल्याची माहिती समोर आलीय. दरम्यान, या निवडणुकीसाठी १० जागा मिळाव्यात यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचाआग्रह आहे.

जर या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉग्रेसला समाधानकारक जागा मिळाल्या तरच सर्वपक्षीय पॅनलमधून निवडणूक लढणार, अन्यथा महाविकास आघाडीच्या माध्यमातून भाजपविरोधात लढण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच या सूचना दिल्याने याबाबत चर्चा करण्यासाठी शुक्रवारी गुलाबराव देवकर अभियांत्रिकी महाविद्यालयात राष्ट्रवादी कॉग्रेसच्या जिल्ह्यातील नेत्यांची बैठक घेण्यात आली.  या बैठकीत माजी विधानसभा अध्यक्ष अरुण गुजराथी, माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, डॉ. सतीश पाटील, जिल्हाध्यक्ष ॲड.रविंद्र पाटील, जिल्हा बँकेच्या अध्यक्षा ॲड.रोहिणी खडसे, माजी आमदार दिलीप वाघ, कैलास पाटील, अरुण पाटील, इंदिरा पाटील, संजय पवार, वाल्मीक पाटील, संतोष चौधरी, नाना देशमुख, तिलोत्तमा पाटील आदी उपस्थित होते.

२०१५ मध्ये झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीकडे १३ जागा होत्या. त्यामुळे आता सर्वपक्षीय पॅनल तयार करण्यात आले तर त्यात १० जागा मिळाव्यात यासाठी राष्ट्रवादीचा आग्रह आहे. दरम्यान, शनिवारी सर्वपक्षीय पॅनलसाठी स्थापन समितीच्या सदस्यांची बैठक पालकमंत्र्यांचा उपस्थितीत होणार आहे.

या बैठकीत देखील कोणत्या जागांसाठी आग्रह धरायचा आणि कोणत्या सोडायचा याबाबत राष्ट्रवादीच्या बैठकीत चर्चा झाली. अजित पवार यांनी जिल्हा बँकेत भाजपसोबत जायला होकार दर्शविला असला तरी या पॅनलमध्ये राष्ट्रवादी जागांबाबत तडजोड करुन नका अश्या सूचनाही त्यांनी जिल्ह्यातील नेत्यांना दिला आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज