कोळी क्रिकेट लिग स्पर्धेत महर्षी व्यास संघाचा विजय

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ डिसेंबर २०२१ । कोळी क्रिकेट लिग पर्व दुसरे स्पर्धेची अंतिम सामना महर्षी व्यास आणि माँ ११ यांच्यात झाला. नाणेफेक महर्षी व्यास यांनी जिंकला मात्र प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. महर्षी व्यास संघाने प्रथम फलंदाजी करताना १५० धावा केल्या यात पवन तायडे आणि सागर सपकाळे यांनी अर्ध शतक पूर्ण केले. प्रतिउत्तर माँ ११ संघाने १२७ धाव संख्या गाठून उपविजेता संघ ठरला.

माजी उपमहापौर डॉ.अश्विन सोनवणे,नगरसेवक मुकुंदा सोनवणे,सामाजिक कार्यकर्ते भरत सपकाळे,सागर सोनवणे,राहुल ठाकरे,डॉ.परीक्षेत बाविस्कर, सागर सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते विनोद तायडे,राहुल ठाकरे,इंजि.राहुल सोनवणे,दिनेश सोनवणे मान्यवर निलेश तायडे,मुकेश बाविस्कर यांची उपस्थिती लाभली.

मान्यवरांच्या हस्ते चषक प्रदान करण्यात आला.खेळाडूंमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अश्विन शंकरपाळ, युवराज सोनवणे, ऋषिकेश सोनवणे, विजय कोळी,स्वप्निल सूर्यवंशी,संजू जतकर,सचिन सोनवणे ,मयूर सपकाळे,वरूण बाविस्कर,भूषण कोळी,विशाल शिरसाठ, प्रवीण इंगोले यांचे सहकार्य लाभले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -