fbpx

महाराष्ट्र राज्य महापौर परिषदेत वाजला जळगावचा डंका

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ जुलै २०२१ । जळगाव महानगरपालिका क्षेत्रातील सव्वा लाखहुन अधिक नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. जळगाव शहरातील नागरिक मोठ्या उत्साहात लसीकरण करून घेत आहेत. यामुळे महापालिकेला जास्तीत जास्त लसी मिळवून देण्याची मागणी महापौर जयश्री महाजन यांनी महाराष्ट्र राज्य महापौर परिषदेमध्ये केली.
महाराष्ट्र राज्य महापौर परिषदेचे आयोजन गुरुवारी बृहन मुंबई महानगरपालिकेच्या महापौर किशोरी पेढणेकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले होते.महानगरपालिकेने कोरोना काळात बजावलेल्या कामगिरी बद्दलचा आढावा घेण्यासाठी या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

शून्य कोरोना
जळगाव शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेनदिवस कमी होत आहे. सलग २ दिवस जळगाव शहरात एकही कोरोना रुग्ण आढळलेला नाहीये. असे यावेळी जयश्री महाजन यांनी सांगितले. कोरोना आता आटोक्यात आला असून यापुढे होणाऱ्या महासभा या ऑफलाईन स्वरूपाच्या व्हाव्यात अशी मागणीही यावेळी यांनी केली.

निमोनिया लसीकरणाचा केला विषेश उल्लेख.
महापौर जयश्री महाजन म्हणाल्या की, जळगाव शहरात महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये आणि शासकीय रुग्णालयांमध्ये नवजात शिशुंना मोफत निमोनियाची लस देण्यात येणार आहे.यामुळे त्या कुटुंबाचे मोठे पैसे वाचणार आहेत.असे त्यांनी सांगितले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज