fbpx

१० वी, १२ ची निकाल लवकरच जाहीर होणार, जाणून घ्या कसा पहावा निकाल?

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० जून २०२१ । कोरोना व्हायरसमुळे यंदा महाराष्ट्र बोर्ड १० वी आणि १२ वीचे निकाल अद्याप लागलेले नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकही निकालाच्या प्रतिक्षेत आहेत. दरम्यान, आता लवकर १० वी, १२ वीचा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. १५ जुलैपर्यंत १० वीचा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. तर १२ वीचा ३१ जुलै पर्यंत जाहीर करण्यात येऊ शकतो.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता 10 वी बोर्डाचा निकाल अधिकृत वेबसाइट mahresult.nic वर जाहीर केला जाईल. दहावीचा निकाल 9 वी आणि 10 वीच्या (अंतर्गत गुण) घेण्यात आलेल्या परीक्षांवर आधारित असेल. तर जे विद्यार्थ्याने आपल्या गुणांबाबत समाधानी नाही, ते विद्यार्थी नंतर परीक्षा देऊ शकतात, असं महाराष्ट्राच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी यापूर्वीच सांगितलंय.  

दरम्यान, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केल्यानुसार, यावर्षी राज्यातील बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांना पास केलं जाईल आणि त्यांच्या गुणांचे अंतर्गत मूल्यांकनानुसार गुण दिले जातील.तसंच मूल्यांकन निकष देखील लवकरच जाहीर केले जातील, असं शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं आहे.

असा चेक करा निकाल?

सर्व प्रथम विद्यार्थ्यांनी बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर जावं.

होम पेजवरील SSC परीक्षा निकाल 2021 लिंकवर क्लिक करा.

एक नवीन पेज स्क्रीनवर दिसेल.

आपल्या रोल नंबरसह मागितलेली अन्य माहिती येथे भरा.

सबमिट वर क्लिक करा.

आता SSC निकाल 2021 आपल्या स्क्रीनवर दिसून येईल.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

munot-kusumba-advt