अधिकारी होण्याची सुवर्णसंधी…MPSC मार्फत PSI, कक्ष अधिकारी, कर निरीक्षक पदाच्या 666 जागा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 ची 666 पदांची जाहिरात जारी केली आहे. याद्वारे पोलीस उपनिरिक्षक, राज्य कर निरीक्षक आणि सहायक कक्ष अधिकारी पदासाठी भरती प्रक्रिया राबवली जाईल.

पदांचा तपशील

1) सहायक कक्ष अधिकारी पदाच्या 100 जागा

2) राज्य कर निरीक्षक – 190 जागा

३) पोलीस उपनिरिक्षक – 376 जागा

पात्रता : 

भारत सरकारनं मान्यता दिलेल्या विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. याशिवाय पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेला बसलेले उमदेवार देखील अर्ज दाखल करु शकतात. मात्र, मुख्य परीक्षेपूर्वी त्यांनी उत्तीर्ण होणं आवश्यक आहे.

परीक्षा शुल्क :

खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क 544 तर मागासवर्गीय उमेदावारंसाठी 344 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. हे शुल्क ऑनलाईन ऑफलाईन पद्धतीनं भरता येईल.

शारीरिक पात्रता  : 

पोलीस उपनिरीक्षक पदासाठी पुरुष उमेदवाराची उंची 165 सेमी तर महिला उमेदवारची उंची 157 सेमी असणं आवश्यक आहे. तर पुरुष उमेदवारांना किमान 5 सेमी छाती फुगवता आली पाहिजे.

पूर्व परीक्षा कधी होणार?

सदर परीक्षा दिनांक 26 फेब्रुवारी, 2022 रोजी आयोजित करण्यात येईल

महत्वाच्या तारखा :

महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 साठी अर्ज दाखल करण्यास सुरुवात 29 ऑक्टोबर दुपारी 2 वाजल्यापासून होणार आहे. अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिनांक 19 नोव्हेंबर आहे.

जाहिरात पाहण्यासाठी :  येथे क्लीक करा 

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज