fbpx

आजही राज्यात मुसळधार ; उत्तर महाराष्ट्रातला यलो अलर्ट जारी

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २० ऑगस्ट २०२१ । गेल्या काही दिवसापासून दडी मारलेल्या पावसाने राज्यात पुन्हा कमबॅक केलं आहे. सध्या राज्यातला पावसाचा मुक्काम वाढला असून आजही राज्यांतल्या काही भागांत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. हवामान विभागाच्या वतीने उत्तर महाराष्ट्रात यलो तर विदर्भात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

खान्देशात सलग तिसऱ्या दिवशीही पावसाचा जोर कायम होता. गिरणा व मन्याड धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे या दोन्ही प्रकल्पांच्या जलसाठ्यात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. जवळपास १ हजार क्युसेक आवक धरणात हाेत असल्याने गिरणा धरणाच्या पाणीसाठ्यात २ टक्के वाढ झाली आहे.

तसेच हतनूर धरणाचे आज सकाळी १४ दरवाजे उघडण्यात आले. त्यामुळे तापीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. दरम्यान, राज्यात गुरूवारी सर्वदूर पाऊस झाला.

२० आणि २१ ऑगस्ट रोजी जळगाव, धुळे, नंदुरबार आणि नाशिक जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. या काळात काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे.

उत्तम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात पावसाने पिकांना जीवदान मिळालं आहे. पावसाचा जोर आणखी दोन दिवस राहिल, त्यानंतर पाऊस कमी होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

कोणत्या जिल्ह्यांना यलो अलर्ट?

मुंबई, ठाणे, धुळे, नंदूरबार, जळगाव

विदर्भात ऑरेंज अलर्ट

नाशिक, पालघर, विदर्भातील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

20 ऑगस्टला (आज) राज्यातील पावसाची स्थिती कशी?
20 ऑगस्टला अमरावती आणि नागपूरला यलो अ‌ॅलर्ट देण्यात आलाय. विदर्भातील इतर जिल्ह्यांतही पावसाचा अंदाज आहे. तर, उर्वरित महाराष्ट्रात ठिकठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज