fbpx

शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज : आज राज्यातील ‘या’ भागात पावसाची शक्यता

जळगाव लाईव्ह न्यूज । ०८ जुलै २०२१ । जळगाव लाईव्ह न्यूज । ०८ जुलै २०२१ । मागील गेल्या काही दिवसापासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. राज्यात पावसासाठी पोषक स्थिती तयार झाली असून आज आणि उद्या राज्यातील अनेक ठिकाणी वादळी वारे विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान खात्याच्या विभागाने वर्तविली आहे.

कोकण किनारपट्टीवर आज आणि उद्या मुसळधार पाऊस पाहायला मिळेल. तर विदर्भ, मराठवाडय़ासह मध्य भारतात 9 जुलैपासून पाऊस होणार होईल. तसेच 11 जुलैला अनेक ठिकाणी कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होईल. त्यामुळे पावसाचा जोर आणखी वाढेल, असा अंदाज वर्तवला जात आहे.

मध्यंतरी पेरणी योग्य पाऊस झाल्याने राज्यातील अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरणी केली. मात्र, राज्यात गेल्या काही दिवसापासून पावसाचे दडी मारली आहे. यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला असून दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर आले आहे. 

दरम्यान, आता राज्यात पावसासाठी पोषक स्थिती तयार झाली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, राज्यामध्ये आजपासून (8 जुलै) वादळी वारे विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. कोकण, विदर्भातील अनेक ठिकाणी  दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात या भागात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांची नजर ही आकाशाकडे लागून राहिलीये.

राज्यात कुठे कधी पाऊस?

8 जुलै : पुणे, नगर, नाशिक, जळगावात काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह पाऊस. तर परभणी, हिंगोली, नांदेडमध्येही पावसाची हजेरी.

 

9 जुलै : कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस

 

10 जुलै : मुंबई, ठाण्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस

 

10 जुलै : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा.

 

10 जुलै : पुणे, कोल्हापूर, सातारा जिल्ह्य़ांत तुरळक भागात मुसळधार ते अतिवृष्टीची शक्यता

 

11 जुलै : मुंबई, ठाण्यासह कोकण विभाग, मध्य महाराष्ट्रातील संबंधित विभागांमध्ये काही ठिकाणी जोरदार पाऊस

 

11 जुलै : विदर्भातील नागपूर, वर्धा जिल्ह्य़ांत मुसळधार, तर मराठवाडय़ातही काही ठिकाणी पावसाचा जोर वाढणार

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज