fbpx

…तर महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन लावावं लागेल ; मुख्यमंत्र्यांचा इशारा

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ ऑगस्ट २०२१ । स्वातंत्र्यदिनानिमित्त आज रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण पार पडले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्याला उद्देशून भाषण केलं आहे. त्यांनी राज्यात पुन्हा लॉकडाऊनबाबत भाष्य केलं आहे.

१६ ऑगस्टपासून राज्यातील काही बंधनं शिथिल करतो आहोत. पण करोनाचं संकट अजूनही टळलेलं नाही. शिथिलतेमध्ये आवश्यक असलेले निर्बंध पाळावे लागतील. शिथीलता देत असताना ऑक्सिजनचा पुरवठा ठरवून आपण शिथिलता देत आहोत. ज्यावेळी असं लक्षात येईल, की ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतोय, त्यावेळी कदाचित आपल्याला लॉकडाऊन पुन्हा लावावा लागू शकतो,’ असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.

पुढे बोलताना म्हणाले की, आपण पुढचा स्वातंत्र्यदिन भयमुक्त, कोरोनामुक्त साजरु करु, असा सगळ्यांनी निश्चय करावा. नियमांचं पालन करणं गरजेचं आहे, तरच आपण कोरोनाला घालवू शकतो, असं ते म्हणाले.

मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यात लसीकरणाने वेग घेतलाय. काल राज्यभरात साडे नऊ लाख लोकांचं लसीकरण झालं आहे. हा राज्यात लसीकरणाचा उच्चांक आहे. आपण एक निश्चय करु, मी माझं राज्य, देश कोरोनामुक्त करणारच, असं ठाकरे म्हणाले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज