पावसाचा फटका, महाराष्ट्र एक्सप्रेस ‘या’ स्टेशनपर्यंतच धावणार

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ जुलै २०२१ । राज्यात पाऊस सुरू असल्याने अनेक गाड्या रद्द करण्यात येत आहे. या पावसाचा फटका महाराष्ट्र एक्सप्रेसला देखील बसला आहे. काेल्हापुरात पुराचा कहर सुरू असल्याने गाेंदिया-काेल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेस ही गाडी आता काेल्हापूरऐवजी मिरजपर्यंतच जाते. 

महाराष्ट्र एक्स्प्रेस ही गाडी काेल्हापूरपर्यंत जाते. मात्र काेल्हापुरातील सध्याच्या पूरस्थितीमुळे ही गाडी मिरजपर्यंतच धावते आहे. काेल्हापुरातील पूरस्थिती ओसरल्यावर ही गाडी नेहमीप्रमाणे काेल्हापूरपर्यंत चालवली जाईल.

सध्या ही गाडी मिरजपर्यंतच धावत असून, तेथूनच परतीचा प्रवास करत आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांनी याची नोंद घ्यावी. आगामी काही दिवस महाराष्ट्रची अशीच स्थिती कायम राहणार आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -