अधिवेशन संपले : राज्यातील १० मंत्र्यांसह २० आमदार कोरोना पॉझिटिव्ह

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । १ जानेवारी २०२२ । महाराष्ट्रात कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन व्हेरिएंट संसर्गामुळे परिस्थिती गंभीर होत चालली आहे. दिवसेंदिवस मोठ्या संख्येने कोरोना रुग्ण आढळून येत आहे. अशातच ठाकरे सरकारची आणखी चिंता वाढवणारी बातमी समोर आलीय. राज्य मंत्रिमंडळातील तब्बल १० मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, राज्यातील विविध पक्षातील २० आमदारांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. याबाबतची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली आहे.

अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज सकाळी कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक विजयस्तंभास अभिवादन केले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना राज्यातील कोरोना स्थितीबाबत त्यांनी माहिती दिली. ‘करोनाच्या बाबतीत कालच राज्य सरकारनं नवीन नियमावली जाहीर केली आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता नागरिकांनी नियमांचं भान ठेवलं पाहिजे. लग्नसमारंभ आणि अशा प्रकारचे समारंभ मोठ्या स्वरूपात व्हावेत असं प्रत्येकाला वाटतं. परंतु, कोरोनाच्या नव्या स्वरूपातील विषाणूचा संसर्ग वेगाने होतो हे लक्षात घेतलं पाहिजे.

पाश्चात्य देशात प्रचंड प्रमाणात बाधित रुग्ण सापडत आहेत. आपण दुसऱ्या लाटेची मोठी किंमत मोजली आहे. त्यामुळे नागरिकांच्या जीविताच्या काळजीपोटीच राज्यानं नियम कठोर केले आहेत. काही राज्यांनी रात्रीची जमावबंदी, टाळेबंदी केली आहे. राज्यात मुंबई आणि पुणे येथे करोनाबाधितांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळं सर्व नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावं आणि करोनाचा संसर्ग पसरणार नाही याची काळजी घ्यावी, असं आवाहन अजित पवार यांनी केलं. अर्थात, करोना रुग्णांची संख्या वाढत राहिल्यास आणखी कठोर निर्बंध लावावे लागतील, असा इशाराही त्यांनी दिला.

राज्यात काल कोरोनाचे 8,067 नवीन रुग्ण आढळले, जे आदल्या दिवसाच्या तुलनेत सुमारे 50 टक्के जास्त आहेत. त्याच वेळी, गेल्या 24 तासांत आठ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -