fbpx

पांडुरंगाची ओढ, हरिनाम सप्ताहची जोड : महाराजांनी ओलांडले पुराचे नदी पात्र

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । मयुर घाडगे । रात्री अचानक जोरदार पाऊस झाल्याने चाळीसगावातील डोगरी नदीने धोक्याची पातळी लोलांडली डोंगरी नदीच्या पाणलोट क्षेत्रात मोठा पूर आला असून काही भागांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
नदीला पूर आल्याने काही गावांचा संपर्क तुटला आहे त्यात शिवापूर गावाचा ही समावेश आहे.

शिवापूर गावात अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण सोहळा 24 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट आयोजन करण्यात करण्यात आला असून आज म्हणजे 31 ऑगस्ट ला गोपाळ कल्याला हरिमान सप्ताहची सांगता म्हणजे शेवटच्या दिवशी ह.भ.प रामकृष्ण महाराज बाणगावकर यांचे काल्या निमित्त कीर्तन होते.

महाराज किर्तनासाठी बाणगाव ता नांदगाव वरून जोरदार पावसात सुद्धा टुव्हीलर प्रवास वरून शिवापूर ता चाळीसगाव असा 50 किलोमीटर प्रवास करून किर्तनासाठी महाराज शिवापूर तर आले पण गावाचा पुरामुळे संपर्क तुटल्याने जायचं कस असा प्रश्न निर्माण झाला तेव्हा महाराजांनी चक्क जीव धोक्यात घालून नदीपात्र ओलांडले जीवाची पर्वा न करत किर्तनासाठी महाराजांनी जीव मुठीत धरून डोगरी नदी पात्र ओलांडले. महाराजांचे वय 73 असून या वयात महाराजांचा उत्साह पाहून सर्व गावातील नागरिक थक्क झाले .

पांडुरंगाचा मी असिम भक्त असून पांडुरंगाने मला बोलावले तर मी कुठेही जायला तयार असतो. म्हणून मी माझा जीव धोक्यात घालून नदी पात्र ओलांडले. माझा नियोजित कार्यक्रम असल्याने मला जाण आवश्यक वाटलं किर्तनासाठी नागरिकांना विलंब नको म्हणून आपण आपली सेवा बजावली पाहिजे या वृत्तीचा मी आहे.

– रामकृष्ण महाराज ( बाणगाव ता नांदगाव)

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज