ना. धो. महानोर यांच्या पत्नींशोक

बातमी शेअर करा

 जळगाव लाईव्ह न्यूज । १० सप्टेंबर २०२१ ।  पद्मश्री व  सुप्रसिद्ध मराठी कवी ना. धो. महानोर यांच्या पत्नी सुलोचना महानोर यांचे वृद्धापकाळाने आज (दि.१० सप्टेंबर) रोजी दुपारी बारा वाजता दुःखद निधन झाले. त्या ७९ वर्षाच्या होत्या

शेती, साहित्य आणि रानात रमलेल्या कविवर्य महानोर यांच्या सहचारिणी म्हणून त्यांनी भक्कम साथ दिली. त्यांच्या पश्चात पती, 2 कन्या, 2 पुत्र, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. महानोर यांच्यावर जळगाव येथे इलाज सुरू होता. त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत नव्हती, अस्वस्थता ही वाढली होती. त्यांना जळगाव येथून त्यांच्या पळसखेडे येथील शेतात नेले व तिथे त्यांनी अंतिम श्वास घेतला.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -