पारोळा किल्ल्यातील महादेव मंदिरासाठी व्यापारी महासंघाच्यावतीने मदत फेरी

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ जुलै २०२१ ।  पारोळा येथील किल्ल्यात पुरातन असे महादेवाचे मंदिर असून मागील अनेक वर्षापासुन या मंदिराची डागडुजी झालेली नाही. या मंदिर परिसरात घाणीचे सामराज्य झाले आहे. या मंदिरात दरवर्षी श्रावण महिण्याच्या तिसऱ्या सोमवारी सार्वजनिक सत्यनारायणाची महापुजेचे आयोजन करण्यात येत असते. परंतु मागील दोन वर्षापासून कोरोनामुळे या सार्वजनिक महापुजेला ब्रेक लागला आहे.

म्हणुन यावर्षी पारोळा व्यापारी महासंघाच्या वतीने या मंदिराचे रंगरागोंटी करुन तसेच डागडुजी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या कार्यात संपुर्ण शहराचा हातभार लागावा म्हणुन व्यापारी महासंघाच्या वतीने संपुर्ण बाजार पेठ, कजगाव रोड, बस स्टॅण्ड कडील संपुर्ण भागात फिरुन मंदिरा साठी मद्दत फेरी काढण्यात आली.

यावेळी अनेक लहान मोठ्या व्यापार्यानी आप आपल्या परिने या शुभ कार्यात आपला सहभाग नोंदवला या मद्दत फेरीत पारोळा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष केशव क्षत्रीय, उपाध्यक्ष अशोककुमार लालवाणी, सचिव संजय कासार, किराणा व्यापारी अध्यक्ष अरुण वाणी, विलास वाणी, दिनेश गुजराथी, नगरसेवक नितिन सोनार, दिलिप शिरुडकर, शंकर हिंदुजा, प्रकाश आबा शिंपी, प्रमोद शिरोडे, दिनेश गुजराथी, देविदास वाणी, महेश हिंदुजा, आकाश महाजन, अमोल वाणी, गजेंद्र वाणी, यांच्या सह इतर व्यापार्यानी मद्दत फेरीत फिरुन मद्दत गोळा केली.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -