केसीईतील हँडबॉल स्पर्धेत मु.जे.प्रथम

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ डिसेंबर २०२१ । केसीई सोसायटीचे शिक्षण शास्त्र व शारीरिक शिक्षण शास्त्र महाविद्यालयाच्या वतीने जळगाव विभाग अंतर्गत आंतर महाविद्यालयीन हँडबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. स्पर्धेचे उद्घाटन प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून मु.जे.महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ.श्रीकृष्ण बेलोरकर हे उपस्थित होते तर अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अशोक राणे हे होते.

याप्रसंगी प्रा.यशवंत देसले, डॉ.संजय चौधरी, डॉ.अनिता कोल्हे, डॉ.आनंद उपाध्याय, प्रा.निलेश जोशी मंचावर उपस्थित होते. प्रास्ताविक व आभार प्रदर्शन प्रा. प्रवीण कोल्हे यांनी केले.

स्पर्धेत पुरुषगटात मु.जे. महाविद्यालय प्रथम स्थानी, डीडी एन भोळे महाविद्यालय तृतीय स्थानी तर केसीईचे बीएड व बीपीएड महाविद्यालय तृतीय स्थानी राहिले. महिला गटात कोटेचा महिला महाविद्यालय भुसावळ प्रथम स्थानी, जी डी बेंडाळे महाविद्यालय द्वितीय स्थानी तर मु.जे. महाविद्यालय तृतीय स्थानी राहिले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रा.संदीप केदार,प्रा.अतुल गोरडे, मोहन चौधरी, निलेश नाईक, शैलेश कुलकर्णी, संजय जुमनाके, विजय चव्हाण, केतन पाटील यांचे अनमोल सहकार्य लाभले.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -