fbpx

मू.जे. महाविद्यालयात प्रवेश प्रक्रिया कार्यशाळेचे आयोजन

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ सप्टेंबर २०२१ ।  यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ व मूळजी जेठा महाविद्यालय जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मुक्त विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेच्या अनुषंगाने प्रवेश प्रक्रिया कार्यशाळेचे आयोजन मू.जे. महाविद्यालयात करण्यात आले. नाशिक विभागीय केंद्र अंतर्गत नाशिक, धुळे, अहमदनगर ,जळगाव आणि नंदुरबार या पाच जिल्ह्यांचा समावेश असून विविध शिक्षणक्रमाची एकूण 317 अभ्यास केंद्रे आहेत त्यापैकी जळगाव जिल्ह्यात 61 अभ्यास केंद्र आहेत यावर्षी विद्यापीठाने एम.ए. मराठी, हिंदी ,इंग्रजी, उर्दू, लोकप्रशासन, अर्थशास्त्र तसेच एम.एस्सी . फिजिक्स, केमिस्ट्री,बायोलॉजी, गणित आणि पर्यावरण इत्यादी पदव्युत्तर पातळीवरील शिक्षणक्रम सुरू केलेले आहेत या शिक्षण क्रमांनां मर्यादित जागा उपलब्ध आहेत.

विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर विविध शिक्षणक्रमासाठी संबंधित अभ्यास केंद्रांमध्ये आपला प्रवेश घ्यावा असे विद्यापीठाच्या वतीने माननीय कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन, कुलसचिव डॉ.दिनेश भोंडे, डॉ.प्रकाश देशमुख संचालक , विद्यार्थी सेवा विभाग आणि विभागीय केंद्र नाशिक केंद्राचे संचालक प्रा. डॉ. धनंजय माने तसेच कक्ष अधिकारी विलास दशपुते यांनी आवाहन केले आहे. या अनुषंगाने प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन कार्यशाळा मुळजी जेठा महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेली होती.

कार्यक्रमास विभागीय केंद्राचे संचालक डॉ. धनंजय माने कक्षाधिकारी विलास दसपुते, मू जे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.स.ना. भारंबे, डॉ. ए पी सरोदे, डॉ. जुगलकिशोर दुबे , प्रवीण बारी आणि रवी पाटील इत्यादी उपस्थित होते सदर कार्यशाळेत जिल्हाभरातून आलेल्या 45 अभ्यास केंद्रातील केंद्र संयोजक व सहाय्यक यांनी आपली उपस्थिती नोंदवली.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज