⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | Lumpy Skin : सावद्यात मनीष पाटील यांच्या पुढाकाराने जनावरांना मोफत लस

Lumpy Skin : सावद्यात मनीष पाटील यांच्या पुढाकाराने जनावरांना मोफत लस

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । दिपक श्रावगे । जिल्ह्यासह ग्रामीण भागात लंपी स्किन डेसिस हा विषाणूजन्य रोग पसरला आहे. तसेच अनेक जनावरे बाधित झाली असून अनेक जनावरे मरण पावली आहेत. यासाठी शासन देखील प्रयत्नशील असून सावदा येथील युवा समाजसेवक मनीष पाटील यांनी पुढाकार घेऊन, स्वखर्चाने लंपी वरील लस सावदा येथे मोफत उपलब्ध करून दिली आहे. दरम्यान, पाटील यांचे कौतुक होत आहेत.

अनेक शेतकरी व पशुपालक लंपी रोगाने त्रस्त असताना व आपली जनावरे कशी वाचवावी या विवंचनेत असतांना मनीष पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. सावदा येथील शेतकऱ्यांसाठी सुमारे १ हजार लंपी रोगावरील लसी मोफत उपलब्ध करून दिल्या. दि.७ रोजी सदर लसी वितरित करून जनावरे यांना देण्यात आल्या. यावेळी सावदा रुग्णालयात लस उपलब्ध नसताना मनिष पाटिल व त्यांच्या सहकार्यांनी १ हजार लस उपलध करुन दिली.

यावेळी पशुवैधकीय अधिकारी डॉ.निलेश राजपूत, पशु सह आयुक्त संजय धांडे, जिल्हा दूध संघाचे संचालक सुरेश नामदेव चौधरी, जगदीश बढे, कुशल जावले, पंकज येवले, माजी नगरसेवक अजय भारंबे, यांचे सह मनोज पाटिल, विनोद पाटिल, अतुल पाटिल, प्रितेश सरोदे, पहेलवान कुरकुरे, शांताराम भारंबे, करण पाटिल, हितेंद्र पाटिल, संजू पाटिल, उज्वल पाटिल, सुजीत चौधरी हे पशुपालक उपस्थित होते.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह