fbpx

भारताचे आणखी एक पदक निश्चित, महिला खेळाडू उपांत्य फेरीत

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० जुलै २०२१ । टोकियो येथे सुरू असलेल्या ऑलम्पिक स्पर्धेत भारताचे आणखी एक पदक निश्चित झाले आहे. ६९ किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत बॉक्सर लोवलीना बोरगोहेन हिने धडक दिली आहे.

लोवलीनाने, तैपेईच्या बॉक्सरला ४-१ ने हरवत उपांत्य फेरी गाठली आहे त्यामुळे भारताचे एक पदक निश्चित झाले आहे.

मेरी कोमनंतर भारताकडून दुसरी महिला बॉक्सर म्हणून पदक मिळवण्याचा पराक्रम लोवलीना हिच्या नावे होणार आहे. आसाम या राज्यातून पहिली महिला ऑलिम्पियन होण्याचा मान देखील तिने पटकावला आहे. ऑलम्पिक स्पर्धेत मीरा चानू नंतर दुसरे पदक भारताच्या खात्यात येणार आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज