fbpx

बोरघाटात रस्तालूट ; तीन वाहनचालकांवर हल्ला करून ५० हजार लूटले

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ एप्रिल २०२१ ।  रावेर तालुक्यात असलेल्या पाल येथील‌ व सावदा पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेले बोरघाटात दि १६ एप्रिल रोजी रात्री १०,३० वाजता रस्त्यावर १५ ते २० जणांच्या टोळक्यांनी झाड आडवे टाकून थेट ३ ते ४ वाहनचालकांना जबर मारहाणी करून जवळपास ५०ते ६० हजार रुपयांची लूट केल्याची धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

सदरील घटनेत लिलाधर भंगाळे, जयेश भंगाळे यांना मारहाणी करून ३० हजार व २१ हजार रूपये किमतीचा एक मोबाईल आणि (एमपी) येथील‌ एक वाहनचालक पासून ४ हजार लूटून वाहन सुद्धा फोडण्यात आले असुन पाल येथील‌ कृषी विज्ञान केंद्रांचे एका वाहनचालकास अडवून त्याला मारहाणी करून ३ते ४ हजार रूपये लूटण्यात आली असल्याची माहिती समजत आहे.

लूटमार करणारी टोळी जवळ, कुऱ्हाड, विळा व मोठा दुंडका असे घातक हत्यार होते सदर घटनेची नोंद १७ रोजी  पोलिस ठाण्यात नसली तरी स.पो.नी. देवीदास इंगोले यांनी मात्र सदर घटने बाबत तपास घेत असल्याचे सांगितले विचारणा केली असता झालेली नाही मात्र पोलिसांनी  दरोडेखोरांचा शोध घेतल्याचे समजते. या भागातील सर्व मोबाईल नेटवर्क यंत्रणा पूर्णपणे बंद असल्याने बरच वेळ पोलिसांना या घटनेची माहिती मिळू शकलेली नाही असे असले तरी नेहमी या डोंगरी व घाट परिसरात मोबाईल रेंज येत  नसून यामुळेसुद्धा येथील रहिवासी नागरिक त्रस्त आहेत याकडे सुद्धा लक्ष देण्याची गरज आहे.

सदरील परिसरात रस्तालूट व दारोड्याच्या घटना घडत असतात मात्र पोलिसांची गस्ती पेट्रोलिंगच्या आभावामुळे जबरन लूट करणाऱ्यांना अधिक फावले आहे. यापूर्वीचे सुध्दा अशा घटना येथे घडल्या असून आज पावेतो त्यांचा कोणताच तपास लागलेला दिसत नाही आणि यात सदरची घटना चा भर पडलेला असून सदर रस्त्याने रात्री-बेरात्री कामानिमित्त वाहनाद्वारे ये-जा करणाऱ्या मध्ये मोठ्याप्रमाणात भय निर्माण झालेला आहे. तरी यापुढे अशा घटना होऊ नये म्हणून पोलिसांनी या आवाहनाला समोर जाऊन लवकरात लवकर दरोडेखोरांना अटक करावी अशी अपेक्षा नागरिकांकडून केली जात आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

munot-kusumba-advt