⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

ब्रेकिंग : महाराष्ट्रातील लॉकडाउन १५ मे पर्यंत वाढवला ; जाणून घ्या नियम

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ एप्रिल २०२१ । राज्यातील  ब्रेक द चेन अंतर्गत लावण्यात आलेला लॉकडाऊन १५ मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. मुख्य सचिव सीताराम कुटे यांनी आज याबाबत आदेश जारी केले आहेत. त्यानुसार १५ मे रोजी सकाळी सात वाजेपर्यंत संचारबंदीसह आता लागू असलेले सर्व निर्बंध कायम राहणार आहेत. याबाबत राज्य सरकारकडून गाइडलाइन्स जारी करण्यात आल्या आहेत.

राज्यात १४ एप्रिलपासून सरकारने कोरोनाबाबतचे निर्बंध लागू केले होते. त्यामध्ये २२ एप्रिलपासून लॉकडाउनच्या कठोर निर्बंधांचा समावेश करण्यात आला होता. आधीच्या आदेशांनुसार हे निर्बंध १४ एप्रिल रोजी संध्याकाळी ८ वाजेपासून १ मे रोजी सकाळी ७ वाजेपर्यंतच लागू असणार होते. मात्र, राज्यातील रुग्णवाढीचा दर आणि मृतांची वाढतच जाणारी संख्या पाहाता लॉकडाउनमध्ये १५ दिवसांची वाढ करण्यात आली आहे. 

 

नियमावलीत नेमके नियम कोणते?

1. 1 मे रोजी सकाळी 7 वाजल्यापासून राज्यात कडक लॉकडाऊन

2. 15 मेच्या सकाळी 7 वाजेपर्यंत कडक लॉकडाऊन

3. सामान्यांना मुंबई लोकल प्रवास पूर्ण बंद

4. सामान्यांसाठी मेट्रो, मोनो प्रवास बंद

5. राज्यात जिल्हा बंदी लागू

6. अत्यावश्यक कारणाशिवाय आंतरजिल्हा प्रवास बंद

7. सर्वसामान्यांच्या विनाकारण प्रवासावर बंदी

8. खासगी वाहतुकीला केवळ अत्यावश्यक कारणांसाठी परवानगी

9. सार्वजनिक वाहतूक 50% क्षमतेनं चालणार

10. एसटी बस वाहतूक 50% क्षमतेनं सुरू राहणार

11. अंत्यविधी, आजारपणासाठी प्रवासाची मुभा

12. खासगी वाहतूकदारांनी नियम मोडल्यास 10 हजार दंड

13. सरकारी कार्यालयांमध्ये 15% उपस्थिती

14. अत्यावश्यक सेवेतील सर्व कार्यालयं 15% हजेरीनं चालणार

15. लग्न समारंभासाठी 25 जणांना फक्त 2 तासांसाठी परवानगी

16. लग्नाचे नियम मोडल्यास 50 हजार दंड भरावा लागणार

17. बाहेरून येणाऱ्यांना 14 दिवस होम क्वारंटाईन करणार

18. होम क्वॉरंटाईन नागरिकांच्या हातावर शिक्का बंधनकारक

19. कोरोना संक्रमीत रुग्णांना संस्थात्मक विलगीकरणात पाठवणार

20. फक्त अत्यावश्यक कारणासाठीच घराबाहेर पडता येणार