रस्त्यालगत झुडपात टाकले स्त्री जातीचे जिवंत अर्भक, जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ जानेवारी २०२२ । पाच दिवसाचे स्त्री जातीचे जिवंत अर्भक रावेर तालुक्यातील कर्जोद-अहिरवाडी रस्त्यावर सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. कोणी तरी अज्ञात व्यक्तीने या रस्त्यालगत झुडपात हे अर्भक टाकल्याचे बुधवारी दुपारी आढळून आले. येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून अर्भकास जळगाव जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले.

अहिरवाडी येथील रस्त्याने जाणाऱ्या एका युवकाच्या निदर्शनास दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास ही घटना आली. झुडपाजवळ जमिनीवर विना कपड्यातील अर्भकाचा रडण्याचा आवाज युवकास आला. त्याने जवळ जाऊन पाहिले असता जिवंत अर्भक त्यास दिसले. त्याने याबाबत पंचायत समितीच्या उपसभापती धनश्री सावळे यांचे पती संदीप सावळे यांना माहिती दिली. त्यांनी तत्काळ हे अर्भक येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. वैद्यकीय अधिकारी डॉ.अनिकेत चव्हाण यांनी या अर्भकावर तातडीने प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्याला जळगाव येथील जिल्हा रुग्णालयात पाठवले.

या संदर्भात येथील पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पाेलिस कर्मचारी करत आहेत. दरम्यान या प्रकरणी हाेत असलेल्या तपासाकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -