पशुधन लसीकरण मोहीमेचा सुकळी येथून शुभारंभ

जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । साथीच्या आजारांपासून पशुधनाचे संरक्षण व्हावे, या उद्देशाने सभापती विकास पाटील यांच्या संकल्पनेतून मुक्ताईनगर तालुक्यात पशुसंवर्धन विभागामार्फत लसीकरण मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहीमेचा शुभारंभ नुकताच सुकळी येथुन करण्यात आला.

मुक्ताईनगर तालुक्यातील प्रमुख व्यवसाय शेतीसह पशुपालन मोठ्या प्रमाणावर केले जाते. बदलत्या हवामानामुळे गाय, म्हशी यांसारख्या पाळीव प्राण्यांमध्ये तोंडखुरी, पायखुरी यासारखे साथीचे आजार पसरण्याची भीती असते. या साथीच्या आजारांपासून जनावरांचे संरक्षण व्हावे व रोगप्रतिकारक शक्ती संतुलित राहावी यासाठी लसीकरण करणे गरजेचे असल्याने सभापती विकास पाटील यांच्या संकल्पनेतून पशुसंवर्धन विभागामार्फत मुक्ताईनगर तालुक्यात लसीकरण मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेतर्गत आतापर्यत दहा हजारांहून अधिक जनावरांना लसीकरण करण्यात आले. येत्या काही दिवसांत संपुर्ण तालुक्यात लसीकरण केले जाणार असल्याचे मुक्ताईनगर पंचायत समिती सभापती विकास पाटील यांनी ‘जळगांव लाईव्ह’शी बोलतांना सांगितले.

पशुपालकांचा उत्तम प्रतिसाद
सुकळी येथून या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला असून सुकळी, डोलारखेडा, कुऱ्हा, वडोदा, पारंबी, भोकरी, तरोडा, नायगांव व निमखेडी खुर्द आदी गावात या मोहिमेला पशुपालकांनी उत्तम प्रकारे प्रतिसाद दिला. लवकरच संपुर्ण तालुक्यात ही मोहीम राबवून लसीकरण करण्यात येणार आहे. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. डुघ्रेकर यांच्यासह पशुसंवर्धन विभागातील अधिकारी व कर्मचारी कार्यरत परिश्रम घेत आहेत. पशुपालकांनी पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आपापल्या पशुंचे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन सभापती विकास पाटील व लसीकरण करणाऱ्या टिमकडून करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज