fbpx

जनावरांमध्ये लम्पि आजाराचे थैमान पशुधन धोक्यात, लसीकरण मोहीम राबवावी : खासदार उन्मेष पाटील

जळगाव लाईव्ह न्यूज । २ ऑक्टोबर २०२१ । जळगाव शहराची दयनीय अवस्था सगळ्यांनाच माहिती आहे. जळगाव शहरात लवकरच रस्ते होतील असे सांगत सत्तापालट झाला. मात्र रस्ते काय होत नाहीयेत. यामुळे जळगाव शहरातील नागरिक त्रस्त आहेत. यामुळे सामाजिक कार्यकर्ते दीपक गुप्ता यांनी जळगाव शहरातील नागरिकांच्या वतीने एक शपथ पत्र लिहिले आहे.

सद्यस्थितीत जनावरांमध्ये लम्पी स्कीन डिसीज हा विषाणूजन्य चर्मरोग असून हा साथीचा आजार आहे. यात संकरीत जनावरांना संसर्ग होण्याची जास्त शक्यता असते. या आजारामध्ये प्रथम जनावरांच्या डोळ्यातून व नाकातून पाणी येणे, लसिका ग्रंथीना सूज येणे, साधारणतः एक आठवडाभर भरपूर ताप येणे, व त्यानंतर त्वचेवर हळूहळू १०-५० मि.मी. व्यासाच्या गाठी किंवा पुरळ येणे अशी लक्षणे आहेत. अनेक जनावरांच्या डोके, मान, पाय, मायांग, कास भागात याची लक्षणे दिसून येतात. दुधाळ जनावरांना संसर्ग झाल्यास दुग्धउत्पादन घटते तसेच काही वेळा गायी वा म्हशीचा गर्भपात होवून प्रजनन क्षमता देखील घटते. अशा तक्रारी शेतकऱ्यांनी खासदार उन्मेश पाटील यांच्याकडे केल्या आहेत

mi advt

आपल्या पत्रात खासदार उन्मेश पाटील यांनी नमूद केले आहे की सद्यस्थितीत लंपी स्किन आजाराचा संसर्ग होऊ नये, यासाठी लक्षणे असलेल्या जनावरांना वेगळे करावे. यासाठी जनजागृती करण्यात यावी. तसेच बाधित व निरोगी जनावरे एकत्रित चारावयास सोडू नयेत. जनावरांची बाधित भागातून ने-आण बंद करावी, रोग नियंत्रणासाठी माशा, डास व गोचीड इत्यादींचे निर्मुलन करण्यात यावे. कीटकनाशक औषधीचा जनावराच्या अंगावर व गोठयात फवारणी आदी उपाययोजना कराव्यात यासाठी पशुसंवर्धन विभागाने गावोगावी आवाहन करण्यात यावे.

चाळीसगांव, पाचोरा, भडगाव येथे लंम्पि चे अधीक संक्रमण
जिल्ह्यात जनावरांमध्ये लंपी स्किन आजार संक्रमण वाढत असून यात चाळीसगांव , भडगाव व पाचोरा तालुक्यात जनावरांचा नमुना तपासणी अहवाल पॉझीटिव्ह आल्याने . ऍक्शन प्लॅननुसार , त्या गावापासून 5 कि. मी. क्षेत्रातील सर्व जनावरांमध्ये अधिकाधीक प्रमाणात लसीकरण करण्यात यावे. चाळीसगांव,भडगांव व पाचोरा तालुक्यात पशुधन लसीकरण मोहिमेसाठी पथके तैनात करावीत. जास्तीत जास्त लसीचे डोस उपलब्ध करण्यात येऊन गाव पातळीवर आवश्यकतेनुसार लस उपलब्ध करून देण्यात याव्यात. अशी मागणी खासदार उन्मेश पाटील यांनी केली आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज