fbpx

साहित्यिक विलास मोरे यांचे.” संगणकाची गाणी ”  द्वितिय आवृत्ती प्रसिध्द

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ ऑगस्ट २०२१।  एरंडोल येथील साहित्यिक विलास मोरे यांच्या संगणकाची गाणी या कविता संग्रहाची दुसरी आवृत्ती दिलीपराज प्रकाशन पुणे  या प्रकाशन संस्थेने पुणे येथे प्रकाशित केली .या बाबत प्रकाशन संस्थेकडून नुकतेच विलास मोरे यांना कळविण्यात आलेले आहे .

या पूर्वी ” संगणकाची गाणी” हा बालकविता संग्रह  सन २०१७ मध्ये प्रसिद्ध झालेला  होता.संगणकावर प्रसिद्ध झालेला तो पहिलाच संपूर्ण बाल कविता संग्रह आहे.लहान मुलांमध्ये संगणकाची असलेली आवड आणि  जिज्ञासा विचारात घेऊन , तसेच या बाल कविता संग्रहाची  विविध वाचनालय व  शाळा, आणि शालेय विद्यार्थी , वाचकवर्ग यांची मागणी लक्षात घेऊन  द्वितिय आवृत्ती प्रकाशित करण्यात आली असल्याचे  प्रकाशक राजीव बर्वे व व्यवस्थापकीय संचालक मोहीत बर्वे यांनी  नमूद केले .
          विलास मोरे यांची “तिसरा डोळा” ही बाल कादंबरी लवकरच दिलीपराज प्रकाशनामार्फत प्रकाशित होणार असून ही कादंबरी दोन भागात प्रकाशित होत आहे .
           

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज