शिंदेंना मूकनायक, काळुंखे, जोशींना जीवनगौरव पुरस्कार

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ जानेवारी २०२२ । पत्रकार दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे पुरस्कार जाहीर करण्यात आले असून, यंदाचा मूकनायक पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार कैलास शिंदे यांना तर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार हेमंत काळुंखे व आल्हाद जोशी यांना जाहीर करण्यात आला आहे.

पुरस्काराचे वितरण २६ जानेवारी रोजी मान्यवरांच्या हस्ते केले जाणार आहे. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघासह प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंढे, राज्य संघटक संजय भोकरे, राज्य सरचिटणीस विश्वास आरोटे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रवीण सपकाळे यांनी हे पुरस्कार जाहीर केले आहे. दरम्यान, यंदा जिल्ह्यातील पाचशे पत्रकारांचा १ लाख रुपयांचा अपघात विमा पत्रकार संघातर्फे काढून देण्यात येणार असल्याचे कळवण्यात येणार आहे.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -

deokar