fbpx

वरणगाव येथील राष्ट्रीय महामार्गाजवळील लवकी नाल्यात शेतकऱ्यांचा जीवघेणा प्रवास

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ ऑक्टोबर २०२१ । वरणगाव ( ता. भुसावळ ) येथील राष्ट्रीय महामार्गाजवळ लवकी नाला आहे. या नाल्यामध्ये पावसाचे पाणी साचल्याने ते रस्त्यावर आले आहे. यामुळे शेतकऱ्यांना जीवघेण्या  पाण्यातून प्रवास करावा लागत आहे. दरम्यान, नाल्याच्या दुसऱ्या बाजूला पन्नास शेतकऱ्यांचे शेत आहे.

पाटबंधारे विभागाने पाणी आडवा  पाणी जिरवा ही  संकल्पना या ठिकाणी राबवली आहे. परंतु रस्त्यांच्या दोन्ही बाजूने हि कोल्हापूर पद्धतीने बंधारे बांधल्याने रस्त्यावर पावसाचे पाणी साठले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. नाल्यांच्या त्या बाजूला पन्नास शेतकऱ्यांची शेती आहे. या शेतामध्ये जायला हा एकच  रस्ता असल्याने दररोज याच रस्त्याने  शेतकऱ्यांना प्रवास करावा लागत आहे. शेतामध्ये उगवून आलेली कपाशी वेचण्यासाठी मजूरही या पाण्यातून जावे लागत असल्याने नकार देत आहेत, त्यामुळे वेळीच याकडे प्रशासनाने लक्ष घालून पाण्याचा मार्ग काढून घ्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज