fbpx

७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्याला जन्मठेपेची शिक्षा

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ सप्टेंबर २०२१ । धरणगाव तालुक्यातील एका ७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्याला एका आराेपीस बुधवारी जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तसेच ५ हजार रूपये दंड देखील केला आहे.

जावेद सलीम शेख असे जन्मठेप सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे. धरणगाव तालुक्यातील एका गावात राहणारी ७ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबीयांसह राहते. २४ जून २०१६ रोजी अल्पवयीन मुलगी शाळेतून घरी आली. जेवण झाल्यानंतर पुन्हा दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घराच्या पुढे काही अंतरावर गेल्यानंतर मोकळ्या जागेवर शौचालयाला गेली. त्यावेळी तेथे राहणारा आरोपी जावेद शेख याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. याप्रकरणी आरोपी जावेद सलीम शेख याच्या विरोधात धरणगाव पोलीस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. जळगाव जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायमुर्ती डी. एन. खडसे यांच्या न्यायालयात या गुन्ह्याचे दोषारोपत्र दाखल करण्यात आले.

सरकारपक्षातर्फे साक्षीदार तपासण्यात आले. यात मुलीची साक्ष व इतर साथीदारांची साक्ष महत्वाच्या ठरल्या. सरकारपक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील चारूलता बोरसे यांनी युक्तीवाद केला. न्या. खडसे यांनी साक्षीपुराव्याअंती न्यायालयाने जावेद सलीम शेख याला दोषी ठरवत ५ वर्षे सश्रम कारावास व ५ हजाराचा दंड, बाल लैंगिक अत्याचार अधिनियमान्वये ७ वर्षे सश्रम कारावास आणि ५ हजाराचा दंड, कलम ५ अन्वये जन्मठेप, ५ हजार रूपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज