LIC ची जबरदस्त योजना ! एकदाच पैसे जमा करा, आयुष्यभर मिळेल पेन्शन

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ डिसेंबर २०२१ । भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) ने एक जबरदस्त योजना सुरु केली आहे. सरल पेन्शन योजना (Saral Pension Plan) असे या योजनेचे नाव असून  ही एक नॉन-लिंक्ड सिंगल प्रीमियम स्कीम आहे. या योजनेअंतर्गत, पॉलिसीधारकाला फक्त एकदाच प्रीमियम भरावा लागतो. यानंतर पॉलिसीधारकाला आयुष्यभर पेन्शन मिळत राहते.

विमा नियामक IRDAI च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार ही तात्काळ वार्षिकी योजना आहे. एलआयसीने या पॉलिसीबद्दल सांगितले आहे की या प्लॅनमध्ये सर्व आयुर्विमाधारकांसाठी समान अटी आणि नियम आहेत. एलआयसीच्या या योजनेअंतर्गत, पॉलिसीधारक दोन उपलब्ध वार्षिक पर्यायांपैकी कोणताही एक निवडू शकतो. या योजनेत, पॉलिसी सुरू झाल्याच्या तारखेपासून 6 महिन्यांनंतर कर्ज देखील मिळू शकते.

सरल पेन्शन योजनेचा पहिला पर्याय
LIC सरल पेन्शन योजना (Saral Pension Plan) निवडण्यासाठी दोन पर्याय आहेत. प्रथम, 100 खरेदी किमतीच्या परताव्यासह जीवन वार्षिकी. हे पेन्शन सिंगल लाईफसाठी आहे, म्हणजेच पेन्शन जोडीदारापैकी एकाशी जोडली जाईल, जोपर्यंत पेन्शनधारक जिवंत आहे तोपर्यंत त्याला पेन्शन मिळत राहील. त्याच्या मृत्यूनंतर पॉलिसी घेण्यासाठी भरलेला बेस प्रीमियम त्याच्या नॉमिनीला परत केला जाईल.

सरल पेन्शन योजनेचा दुसरा पर्याय
दुसरा पर्याय संयुक्त जीवनासाठी दिला आहे. यामध्ये पती-पत्नी दोघांनाही पेन्शन जोडले जाते. यामध्ये जो जोडीदार शेवटपर्यंत जिवंत राहतो, त्याला पेन्शन मिळत राहते. एखाद्या व्यक्तीला जिवंत असताना जितकी पेन्शन मिळते, तितकीच पेन्शनची रक्कम त्यांच्यापैकी एकाच्या मृत्यूनंतरही दुसऱ्या जोडीदाराला आयुष्यभर मिळत राहते. जेव्हा दुसरा निवृत्तीवेतनधारक देखील जग सोडून जातो तेव्हा नॉमिनीला पॉलिसी घेताना दिलेली मूळ किंमत दिली जाते.

ही तात्काळ वार्षिकी योजना
एलआयसीची ही योजना तात्काळ वार्षिकी योजना आहे. म्हणजे पॉलिसी घेताच पेन्शन सुरू होईल. पेन्शनधारकाला पर्याय असतो की तो दरमहा, त्रैमासिक, सहामाही पेन्शन घेईल किंवा वर्षातून एकदा घेईल. कोणताही पर्याय निवडला तरी पेन्शन त्याच पद्धतीने सुरू होईल.

कसे खरेदी करावे
तुम्ही हा प्लॅन ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही खरेदी करू शकता. www.licindia.in या वेबसाइटवरून ऑनलाइन खरेदी करता येईल.
योजनेतील किमान वार्षिकी रु. 12,000 प्रतिवर्ष आहे. किमान खरेदी किंमत वार्षिक मोड, निवडलेला पर्याय आणि पॉलिसी घेणाऱ्याचे वय यावर अवलंबून असेल.
या प्लॅनमध्ये कोणतीही कमाल खरेदी किंमत मर्यादा नाही.
40 ते 80 वर्षे वयोगटातील लोक ही योजना खरेदी करू शकतात.
मासिक पेन्शनचा लाभ घ्यायचा असेल तर महिन्यात किमान एक हजार रुपये गुंतवावे लागतील.
त्याचप्रमाणे तिमाही पेन्शनसाठी एका महिन्यात किमान 3 हजार रुपये गुंतवावे लागणार आहेत.

योजनेच्या अधिक माहितीसाठी एलआयसी कार्यालयात संपर्क करावा.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -