…तरच मिळेल महाविद्यालयात प्रवेश ; विद्यापीठाचे महाविद्यालयांना सूचनांचे पत्र

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ ऑक्टोबर २०२१ । गेल्या काही दिवसांपासून कोरोना संकटापायी बंद असलेले कॉलेज येत्या उद्यापासून (२० ऑक्टोबर) पुन्हा सुरू होणार आहेत. मात्र ज्या विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी यांनी लसीकरणाचे दोन्ही डोस घेतले असतील त्यांनाच महाविद्यालयात प्रवेश मिळणार आहे. ज्यांनी लसीकरण करून घेतले नसेल त्यांनी तत्काळ करावे अशा सूचनांचे पत्र विद्यापीठाने महाविद्यालय व्यवस्थापनांना दिले.

करोनामुळे राज्यातील महाविद्यालये गेल्या दीड वर्षांपासून बंद होती. शाळा सुरू झाल्याने महाविद्यालये कधी सुरू होणार, याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले होते. त्यानंतर सरकारने महाविद्यालये २० ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी मार्गदर्शक तत्त्वेही जाहीर करण्यात आली आहेत.

दरम्यान, महाविद्यालयांमध्ये साफसफाईसह तासिकांचे वेळापत्रक तयार केले जात आहे. महाविद्यालयात ५० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त क्षमतेने महाविद्यालय सुरू करण्याबाबत स्थानिक प्रशासनाने निर्णय घेतले आहेत.

१८ वर्षांवरील ज्या विद्यार्थ्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत, अशाच विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहता येणार आहे. ज्यांनी लसीकरण केले नसेल, त्यांनी तीन दिवसांत लसीकरण पूर्ण करून अहवाल विद्यापीठास द्यावा. कोविडचे नियम पाळून नियमावली तयार करावी, अशा सूचनांचे पत्र विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव आर. एल. शिंदे यांनी हे पत्र महाविद्यालयांना दिले आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज