fbpx

देशाच्या गौरवशाली इतिहासा चे स्मरण करूया – पालकमंत्री गुलाबराव पाटील

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ ऑगस्ट २०२१ । भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या गौरवशाली अमृतमहोत्सवी वर्षा निमित्ताने देशभर विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे यानिमित्ताने भारत सरकारच्या महिती आणि सूचना प्रसारण मंत्रालयाच्या प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो पुणे,गित व नाटक विभाग व क्षेत्रिय लोकसंपर्क ब्युरा जळगाव यांच्या वतीने जळगाव जिल्ह्यात दि २३आँगस्ट ते २९ ही जागर यात्रा फिरणार आहे आज जळगाव जिल्हा चे पालक मंत्री ना गुलाबरावजी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन व जागर यात्रेचा प्रारंभ करण्यात आला

येणारे वर्षभर या या अमृत महोत्सवच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन शासन स्तरावर करण्यात येणार आहे तथा कोविड चे संकट अजुन संपलेले नाही त्यामुळे कोवीड चे सर्व नियमाचे पालन करून स्वातंत्र्या चा अमृत महोत्सव उत्साहाने साजरा करूया असे आवाहन त्यांनी केले

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी या जागर यात्रेस शुभेच्या दिल्या व जागर रथ शासकीय विश्रामगृहात येथे येऊन पालकमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला या प्रसंगी क्षेत्रिय प्रचार अधिकारी प्रदिप पवार आदि मान्यवर उपस्थित होते

भारत सरकारच्या गित व नाटक विभागाची मान्यता प्राप्त कलासंस्था दिशा समाज प्रबोधन बहुउद्देशीय संस्था चे पथनाट्य प्रमुख विनोद ढगे आणि त्यांचे सहकारी यांच्या कलापथका द्वारे सांस्कृतिक कार्यक्रम च्या माध्यमातून स्वातंत्र्य चा अमृत महोत्सव चा जागर करण्यात येणार आहे देश भक्ती, देशप्रेम, राष्ट्रीय एकात्मता व आत्मनिर्भर भारताचा संदेश या कार्यक्रमाच्या माध्यमातून देण्यात येणार आहे

कलापथक प्रमुख विनोद ढगे यांच्या सह सचिन महाजन, दुर्गेश आंबेकर, आवधूत दलाल, अरविंद पाटील, मोहीत पाटील आकाश धनगर, अनिल बाविस्कर विलास पाटील आदि कलावंत सहभागी झाले आहे. क्षेत्रिय लोकसंपर्क ब्युरो चे अधिकारी प्रदिप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही यात्रा जिल्हाभरात फिरणार आहे कोविड चे नियम पाळून स्थानिक लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी, कर्मचारी देशवासियांनी यात सहभागी व्हावे असे आवाहन भारत सरकारचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी प्रदिप पवार यांनी केले आहे

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

munot-kusumba-advt