fbpx

यंदाचा गणेशोत्सव हा आनंदोत्सव म्हणून साजरा करुया – डॉ. मुंढे

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ सप्टेंबर २०२१ । शासनाच्या मार्गदशक सुचनांनुसार सार्वजनिक मंडळानी नियमांचे पालन करावे. गणेश मंडळाना कमीत कमी कागदपत्रांमध्ये आवश्यक ती परवानगी देण्यात येईल यासाठी एक खिडकी योजना सुरु करण्यात येऊन गणेश मंडळांना सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येईल. असे सांगून डॉ मुंढे म्हणाले की, यावर्षीचा गणेशोत्सव हा भक्तीमय वातावरणात आनंदोत्सव म्हणून साजरा करुया. त्याचबरोबर जिल्ह्यातील वाद्यवृंद पथकांना त्यांचे कार्यक्रम सादर करण्याची संधी देण्यासाठी शहरातील मोकळ्या जागेत त्यांचे कार्यक्रम घेऊन त्याचे लाईव्ह सादरीकरणाबाबत विचार करण्यात येईल असे पोलीस अधीक्षक डॉ मुंढे यांनी यावेळी सांगितले.

यावेळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे उपाध्यक्ष सचिन नारळे यांनी मंडळाची भूमिका, कार्यपध्दती व स्थापना आणि विर्सजनाबाबतची भूमिका विशद करुन गणेश मंडळांच्या ठिकाणी ज्यांना रोजगार पाहिजे त्यांची नोंदणी करण्याचा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगितले.

यावेळी विविध गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी शहरातील रस्त्यांची दुरुस्ती व स्वच्छता, वीजेच्या तारांजवळील झाडांच्या फांदा काढणे यासारख्या विधायक सूचना मांडल्या. बैठकीच्या सुरुवातीस निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाबद्दल शासनाच्या मार्गदर्शक सुचनांची माहिती सर्व यंत्रणांना दिली.

या बैठकीस उपविभागीय पोलीस अधिकारी कुमार चिंधा (भापेसे), प्रांताधिकारी प्रसाद मते, डॉ विक्रम बांदल, विनय गोसावी, यांचेसह महापालिका, वीज वितरण कंपनी व जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी, तहसीलदार, नगरपालिकांचे मुख्याधिकारी उपस्थित होते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज