आपले विचार आणि स्वप्न उद्योजकतेच्या दिशेने जाऊ द्या : प्रा. भुषण चौधरी

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ नोव्हेंबर २०२१ । नवीनता आणि उद्योजकता एकत्रितपणे आली की उद्योग क्षेत्रातील नवोपक्रम जन्माला येतात. शिक्षण, नवोपक्रम, रोजगार, संशोधक आणि उद्योजक यांचा समन्वय हवा, आणि हे नवे वळण आपणच आणायला हवे. आपले विचार, आपले स्वप्न उद्योजकतेच्या दिशेने जाऊ द्या, असे आवाहन प्रा. भुषण चौधरी यांनी केले.

केसीई सोसायटी संचलित ‘आयएमआर’ महाविद्यालयामध्ये ‘नॅशनल एन्ट्राप्रिनर डे’ निमीत्त इनोव्हेशन आणि इंक्युबीशन सेंटरचे उद्घाटन मंगळवार दि.१६ रोजी पार पडले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी विद्यापिठाचे मनजितसिंग चढ्ढा, डाॅ.विकास गिते, सेंटरचे मॅनेजर निखील कुलकर्णी, औद्योगिक क्षेत्रातील तज्ञ आषिश पाटील, सुदिप राणे, आयएमआरच्या डायरेक्टर प्रा.डॉ. शिल्पा बेंडाळे आदी उपस्थित होते. इनोव्हेशन आणि इंक्युबीशन सेंटरचे उद्घाटन झाल्यानंतर ते कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या केसीआयआयल (KCIIL) सेंटरशी लिंक करण्यात आले.

पुढे बोलतांना प्रा. भुषण चौधरी म्हणाले की, थाॅमस इडीसन यांनी अनेक शोध लावले, अनेक पेटंट त्यांच्या नावावर होते. परंतु त्यांना एकही पेटंट उद्योगांत परावर्तित करता आला नाही. हेन्री फोर्ड मोठा उद्योजक होता पण एकाही शोध लावला नव्हता असे सांगून त्यांनी उद्योजकांचा प्रवास उलगडुन सांगितला. डाॅ विकास गिते यांनी, ईपीआर म्हणजेच, इंटेलेक्च्यूअल प्रॉपर्टी राईट म्हणजे तुमच्या डोक्यात आसलेल्या आयडिया रजिस्टर करुन घ्या. तुमच्या वस्तू कुणी उचलून नेऊ शकेल, वापरु शकेल पण तुमचे डोके कोणी‌ही वापरू शकतं नाही. तुम्ही जी इंटेलिजन्स प्राॅपर्टी तयार करून ठेऊन शकाल, ती किमान २० वर्षे तुमचीच असेल असे सांगून पेटंट कसे मिळवायचे याविषयी त्यांनी माहिती दिली. मल्टिपल पेटंट करतं राहिले पाहिजे. ते रजिस्ट्रेशन केले पाहिजे आणि रिन्युअलही केलें पाहिजे. त्यासाठी असोसिएशन तयार करा. असोदा येथील लोकांनी असोसिएशन करून भरीत वांगे सुध्दा पेटंट केलें आहे. ते पेटंट सिक्रेट किमान 20 वर्षासाठी असते. तसेच नाॅन डिस्क्लोजर अग्रीमेंट केलेच पाहिजे. प्रोव्हीजनल पेटंट आधी करा, असा सल्लाही त्यांनी दिला. १२ महिन्यात पेटंट पर्मनंट कसे होईल याची प्रक्रिया देखील त्यांनी समजावुन सांगीतली. कार्यक्रमात केसीआयआयएलचे सीईओ मनमीतसिंग चढ्ढा, निखील कुलकर्णी, प्रा.डॉ. शिल्पा बेंडाळे यांनी देखील मार्गदर्शन केले. प्रास्तविक डॉ. वर्षां पाठक यांनी केले तर आभार जय पटेल याने मानले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज