पाळधी परिसरात बिबट्याचा वावर,‎ कृषीपंपांना दिवसा वीजपुरवठ्याची मागणी‎

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ जानेवारी २०२२ ।‎ पाळधीसह‎ परिसरातील चमगाव, चांदसर, शेरी,‎ सोनवद, वाकटुकी, बाभूळगाव,‎ नांदेड, नारणे, अंजनविहीरे‎ ( ता.धरणगाव ) शेतीशिवारात गेल्या आठ ते दहा‎ दिवसांत बिबट्याचा वावर‎ असल्याचे समाेर आले आहे. त्यामुळे हिंस्त्र‎ वन्यप्राण्यांचा धाेका ओळखून‎ कृषीपंपांना रात्री नव्हे तर दिवसा‎ वीजपुरवठा सुरू करावा, अशी‎ मागणी शिवसेनेने येथील‎ कार्यकारी अभियंता कार्यालयात‎ कडुबा कोळी यांना निवेदनाद्वारे केली आहे.‎

यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव‎ गुलाबराव पाटील, धरणगाव‎ ‎ पंचायत समितीचे माजी सभापती‎ मुकुंद नन्नवरे, चांदसरचे‎ लोकनियुक्त सरपंच सचिन पवार,‎ जीवा सेना तालुका उपाध्यक्ष गोपाल‎ सोनवणे, भूषण महाजन, समाधान‎ वाघ, किशोर पाटील, भय्या पाटील‎ उपस्थित होते.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -