fbpx

थेरोळा परिसरात बिबट्याची दहशत; एक गाय केली फस्त

जळगाव लाईव्ह न्यूज । १० ऑक्टोबर २०२१ । रावेर तालुक्यातील थेरोळा परीसरात शेतात बांधलेली गाय बिबट्याने फस्त केल्याची घटना घडली असून यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरीकांकडून होत आहे.

रावेर तालुक्यातील थेरोळा येथील शेतकरी युवराज भावळू पाटील यांच्या शेतात बांधलेल्या गायीला मध्यरात्री बिबट्याने फस्त केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे शेतकऱ्यांसह नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर वनपाल अतुल तायडे यांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला आहे. हल्ला करणारा बिबट्याच असल्याचे निष्पन्न झाले आहे.

mi advt

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज