बिबट्याचा हल्ला, गाय आणि गोऱ्हा ठार

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । १० जानेवारी २०२२ । चाेपडा तालुक्यातील पुनगाव शिवारातील हिरालाल उत्तम बाविस्कर यांचे शेतात बांधलेल्या गुरांवर ८ रोजी मध्यरात्री बिबट्याने अचानक हल्ला चढवला. यात एक गाय व एक गाेऱ्हा बिबट्याने फस्त केला. यामुळे संबंधित शेतकऱ्याचे जवळपास ६० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, या संदर्भात वन विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती देवून ही ते तीन तास उशिरा पाेहाेचले. याबद्द शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.

पुनगाव येथील शेतकरी हिरालाल उत्तम बाविस्कर यांचे गावाशेजारी एक किलाेमीटर अंतरावर शेत आहे‌. नेहमी प्रमाणे गोऱ्ह्यांची जोडी व एक साडेतीन वर्षाची गाय त्यांनी शेतात बांधली होती. रात्रीचा वीज पुरवठा हाेणार असल्याने पिकाला पाणी देण्यासाठी शेतकरी बाविस्कर हे देखील शेतातच थांबले होते. मात्र, रात्री पाऊस पडू लागल्याने ते रात्री १२ वाजता घरी निघून आले. बाविस्कर घरी आल्यानंतर बिबट्याने या गुरांवर हल्ला चढवला. यात एक गोऱ्हा ठार झाला तर दुसऱ्याला बिबट्याने गंभीर जखमी केले. गाईला ठार करून बिबट्याने तिला चक्क ३०० फुट ओढत नेत एका गुंफेत तिचे मांस खाल्ले. सकाळी बाविस्कर यांचा मुलगा आशुतोष बाविस्कर हा शेतात गेला असता ही घटना उघडकीस आली. आशुताेषने ही माहिती प्रमोद बाविस्कर यांना कळवली. त्यांनी तत्काळ वनपाल सूर्यवंशी व आरएफओ आनंदा पाटील यांना फोन केले.

मात्र, तब्बल ८ ते १० वेळा फोन करून ही त्यांनी प्रतिसाद दिला नाही. दरम्यान, यामुळे परिसरात भीती पसरली आहे. तर या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून वन विभागाने बिबट्याचा तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी प्रमोद बाविस्कर यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -